शाळेमध्ये वेळेत उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांच्यावर कठोर कारवाई करणेबाबत teacher time on school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळेमध्ये वेळेत उपस्थित न राहणाऱ्या शिक्षकांच्यावर कठोर कारवाई करणेबाबत teacher time on school 

संदर्भ :- यशवंत क्रांती संघटना यांचे दिनांक ३०.७.२०२४ रोजीचे निवेदन

उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयातील दुर्गम भागातील राधानगरी, चंदगड, आजरा, शाहुवाडी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यातील दुर्गम शाळेवर शिक्षक वेळेत उपस्थित नसल्याचे आढळुन आलेले आहे. सदर बाबत संबंधित शिक्षकाकडे चौकशी केल्यास केंद्रशाळेत माहिती देणेस, पंचायत समिती येथे गेलेबाबत सांगितले जाते. तसेच शिक्षक शाळेवर नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने निदर्शनास आले आहे अशा बाबत तक्रार या कार्यालयाकडे प्राप्त झालेली आहे. सदरची तक्रार यासोबत पुढील कार्यवाहीसाठी आपणाकडे पाठविणेत येत आहे.

तरी आपणास सुचित करण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांनी शाळेत वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. शाळेत उपस्थित राहून शालेय कामकाज वेळापत्रकानुसार करणे आवश्यक आहे. सदर मुख्याध्यापक केंद्रशाळेस माहिती किया सभेसाठी गेल्यास हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करणे आवश्यक आहे. पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय किरकोळ / अर्जित रजेवर जाणेचे नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. याबाबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे आपले द्वारे सर्व शाळांना सुचना निर्गमित करुन केले कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.

जिल्हा परिषदेचे पत्र येथे पहा click here 

Leave a Comment