हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियान २०२४ उपक्रम राबविणे बाबत #har ghar tiranga
संदर्भ:-१. भारत सरकारचे संदर्भ पत्र क्र. No.42-21/44/2022- ΑΚΑM, दि.1.08.2024
२. दि 06.08.2024 रोजीची मा. सचिव, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे घेण्यात आलेली सर्व राज्याची व्हिडीओ कॉन्फरन्स
३. मा. अप्पर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे घेण्यात आलेली दि 07.08.2024 रोजीची व्हिडीओ कॉन्फरन्स
४. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे घेण्यात आलेली दि 08.08.2024 रोजीची व्हिडीओ कॉन्फरन्स ५. मा. मा. अप्पर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि.08.08.2024 रोजीचे पत्र क्र.संकीर्ण/8224/प्र.क्र.223/सां. का-4
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी मागील दोन वर्षाप्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सामुहिक बांधिलकीचे मूर्त स्वरूप असलेल्या व देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी “हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)” अभियान २०२४ राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने मा. अप्पर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या दिनांक ०७.०८.२०२४ व्हिडीओ कॉन्फरन्स अन्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वरील संदर्भ ५ नुसार मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी नागरिकांना झेंड्यांची उपलब्धता होईल यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. ग्रामीण
भागात या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने या उपक्रमाबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. तिरंगा यात्रा ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान जिल्हा व स्थानिक स्तरावर राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणे १.
व राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करण्यासाठी एक दिवस जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आयोजन करणे, यामध्ये तरुण, वृद्ध, पुरुष, महिला या समाजातील सर्व घटकांना सामील करणे.
२. तिरंगा रॅली १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान जिल्हा व स्थानिक स्तरावर सायकल, बाईक, कार यावर तिरंगा ध्वज लावून तिरंगा रॅलीचे आयोजन करणे. यामध्ये राज्य, राष्ट्रीय, ऑलम्पिक खेळातील खेळाडूंना याउपक्रमात सहभागी करून घेणे.
३. तिरंगा रन / मॅरेथान १५ ऑगस्ट ला जिल्हा व स्थानिक स्तरावर देशभक्ती व राष्ट्रध्वजाचे मूल्य साजरे करण्यासाठी रन / मॅरेथॉन आयोजित करणे, यामध्ये युवक-क्रीडा मंडळ, हॉबी ग्रुप, खेळाडू यांचा सहभाग घेणे, क्रीडा व फिटनेस तज्ञ यांना या उपक्रमास आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन, सहकार्य घेणे,
४. तिरंगा देशभक्तीपर संगीत कार्यक्रम (Concerts) १३ ते १५ ऑगस्टला जिल्हा व स्थानिक स्तरावर देशभक्तीपर गायन, संगीत कार्यक्रम आयोजन करणे, यामध्ये सेलिब्रिटी, स्थानिक कलाकार यांना आमंत्रित करून मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग घेणे ५. तिरंगा कॅनव्हास १३ ते १५ ऑगस्टला जिल्हा व स्थानिक स्तरावर 3:2 प्रमाणानुसार कॅनव्हास तयार करून त्यावर
नागरिकांद्वारे स्थानिक भाषेत हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा, जय हिंद असे लिहिणे व त्याचे फोटो केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करणे. ६. तिरंगा शपथ ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्हा व स्थानिक स्तरावर होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांमध्ये तिरंगा शपथ उपक्रम
आयोजित करणे, तिरंगा शपथ https://harghartiranga.com/ या पोर्टलवर उपलब्ध आहे. ७. तिरंगा Tribute – ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा ट्रीब्युट कार्यक्रमांमध्ये शहीद वीर, स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबियांचा
सन्मान करणे व शहीद वीर, स्वातंत्र्यसैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करणे, ८. तिरंगा मेला – ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा मेला आयोजित करून तिरंगा झेंडे, टी-शर्ट, इ. गारमेंट, तिरंगा बॅजेस, हैडीक्राफ्ट
वस्तू, खाद्य पदार्थ, इत्यादी स्टॉल्स लावून स्थानिक कारागीर, कलाकार, महिला बचतगट यांना व्यवसाय उपलब्ध करून देणे. ९. हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)- १३ ते १५ ऑगस्टला या तिन्ही दिवसी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सामुहिक बांधिलकीचे मूर्त स्वरूप असलेल्या व देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम
राबविण्यात यावा, नागरिकांनी आपल्या घरांवर, दुकाने तसेच सर्व सरकारी, खाजगी कार्यालये, संस्था यांवर या तिन्ही दिवसी
तिरंगा ध्वज फडकविणे तिरंगा सेल्फी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या सर्व हर घर तिरंगा अभियानाचे नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून तो फोटो https://harghartiranga.com/ या पोर्टलवर अपलोड करणे. यासाठी सर्व नागरिकांना शालेय,
महाविद्यालयीन विद्यार्थी यांना माहिती देवून प्रचार-प्रसिद्धी करणे.
• तिरंगा हा निशुल्क असणार नाही, नागरिकांनी तो स्वच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात यावे. प्रत्येक जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेला आवश्यक असलेल्या ध्वजांची संख्या निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
• ऑगस्ट २०२२ मध्ये वेलस्पन इंडिया यांचेकडून जिल्ह्यांना पुरवठा करण्यात आलेले परंतु शिल्लक असलेले झेंड्यामधून झेंडा संहितानुसार योग्य असलेले तिरंगा झेंडे वापरावे, त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
• या उपक्रमासाठी ग्रामीण भागात जवळपास १.४६ कोटी कुटुंबे घरे असून इतर कार्यालये, संस्था मिळून १.५० कोटी ध्वज फडकवता येईल असा अंदाज आहे.
गटविकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी/ग्रामसेवक यांच्या बैठका घेवून वरील सर्व कार्यक्रमांचे नियोजन करावे.
विविध स्तरातून सहकार्य मिळविण्यासाठी शाळाकॉलेजेस, एनसीसी, एनएसएस, स्वयं सहाय्यता समूह, युवा मंडळ इत्यादी मधून तिरंगा वॉलेंटीयर्स म्हणून नियुक्त करणे, तसेच स्थानिक स्तरावरून पालकमंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी/ सदस्य, इतर प्रतिष्ठित नागरिक, कलावंत, खेळाडू, अधिकारी यांचेद्वारा नागरिकांना हर घर तिरंगा अभियानाबाबत आवाहन करण्यात यावे.
प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे, याकरीता नागरिकांना माहिती देण्यात यावी. तसेच अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये, तो सन्मानाने जतन करून ठेवावा.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोस्ट ऑफिस, स्थानिक विक्रेते, महिला बचतगट, खादी भांडार यांचे मार्फत ध्वज उपलब्ध करून घेण्याबाबत नियोजन करावे.
घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना व नियमावलीबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. काही गावे/शहरे या ठिकाणी घरे इमारती/कार्यालये/दुकाने यांचे तिरंगा ध्वज लावल्यानंतरचे फोटो व व्हिडीओ ड्रोन शुटिंगने घेवून त्याचे फोटो व व्हिडीओ पाठविण्यात यावेत,
• या संपूर्ण कार्यक्रमांची रेडीओ/आकाशवाणी, टी. व्ही, प्रिंट मिडीया, सोशल मिडिया या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धी करावी. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी या उपक्रमाचा प्रचार-प्रसार होण्यासाठी तिरंगा बॅजेस आतापासून लावावेत.
संगणकावरील स्क्रीनसेवर, वेबसाईट इ. माध्यमातून तिरंगा ध्वज ठेवून वातावरण निर्मिती करावी.
शासकीय इमारती, स्मारके, ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध ठिकाणे याठिकाणी तिरंगा रोषणाई करण्यात यावी.
या उपक्रमाच्या वातावरण निर्मितीसाठी गावात प्रभातफेरी काढण्यात यावी.
• प्रत्येक घरावर तिरंगा लावला जाईल याची खात्री करण्यासाठी शालेय व महाविद्यालायीन विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कार्यालये, संस्था यांचा या अभियानात सहभाग घ्यावा.
तसेच https://harghartiranga.com/ या पोर्टलवर Take a Pledge वर व Next वर क्लिक करून नाव, राज्य व मोबाईल नंबर भरून सेल्फी, तिरंगासह फोटो अपलोड करण्याबाबत नागरिकांना व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना अवगत करण्यात यावे व महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सेल्फी, तिरंगासह फोटो अपलोड होईल यासाठी प्रयत्न करावे, तसेच या सर्व कार्यक्रमांचा अहवाल, माहितीपट तयार करण्यात यावे.
https://harghartiranga.com/ या पोर्टलवरून होडींग्स, बॅनर, तिरंगा शपथ, तिरंगा अॅन्थेम, तिरंगा गीत, तिरंगा कॅनव्हास, सेल्फी बूथ स्टॅन्ड यांचे नमुने, सोशल मिडिया साहित्य डाउनलोड करता येईल.
या उपक्रमासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास व सांस्कृतिक कार्य विभाग, हुतात्मा राजगुरू चौक, मदाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई यांना खालील ईमेलवर व पुढील Google Sheet पाठविण्यात यावा. https://docs.google.com/spreadsheets/d/16yDi0-
WYK1uLIJITZnQMrQXEXW4jod7enxevC0_RCI/edit?usp=sharing maharddat75@gmail.com, mahaculture@gmail.com, maha.amrutbharat@gmail.com