१५ ऑगस्ट,२०२४ या स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षेसाठी सहकार्य करणेबाबत 78th independence day
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ९.०५ वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तसेच मंगळवार, दिनांक १३ ऑगस्ट, २०२४ सकाळी ९.०५ वाजता वरील समारंभाची रंगीत तालीम मा. मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत होणार आहे. यास्तव सोमवार, दिनांक १२ ऑगस्ट, २०२४ रोजी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मंत्रालय व नवीन प्रशासन भवन इमारतींमधील सर्व कार्यालये बंद करतेवेळी सर्व खिडक्यांची तावदाने बंद करावीत. तसेच कार्यालयांमध्ये तपासणी करुन घातपाताच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्याबाबतची माहिती त्वरीत मंत्रालय सुरक्षा, पोलीस नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्र. २२०२३२७० व २२८७२६६७) यांना कळविण्यात यावी.
२. मंत्रालय व नवीन प्रशासन भवन इमारतींमधील सर्व विभाग प्रमुखांना विनंती करण्यात येते की, त्यांच्या विभागातील कार्यालये बंद करतेवेळी वरील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना कृपया विभागातील सर्व
अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्याव्यात. ३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०८०७१५५६२५७५१८ आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,