एकदा झालेल्या बदल्यांबाबत फेरविचार नाही सीईओ कार्तिकेयन एस. यांची कडक भूमिका, दीडशेवर शिक्षक पुन्हा बदल्यांसाठी आग्रही teacher request transfer
कोल्हापूर: पाच दिवस समुपदेशन प्रक्रिया राबविल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित शाळा स्वीकारलेल्या सुमारे दीडशे शिक्षकांनी पुन्हा आपल्याला शाळा बदलून मिळण्याची मागणी केली आहे; मात्र शिक्षकांच्या बदल्या हा विषय संपला असल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी याबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुट्टीचे दिवस असूनही पाच दिवस प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने उत्तम रीतीने पार पडली. मुख्याध्यापक पदोन्नती, जिल्ह्याबाहेरून आलेल्या शिक्षकांना नियुक्त्या, यानंतर नव्याने भरण्यात आलेले शिक्षक यांना
नियुक्त्या अशा प्रक्रियेद्वारे शिक्षकांना शाळा देण्यात आल्या, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी चांगली प्रक्रिया राबवली. याबद्दल शिक्षक संघटनांनी या दोन्ह अधिकाऱ्यांचा सत्कारही केला; परंत आता मात्र झालेल्या १८०० बदल्यांपैकी १५० हून अधिव शिक्षकांनी पुन्हा आपल्याला आधीचं शाळा मिळावी आणि दिलेली शाळ म्हणून अर्ज केले आहेत; परंत बदल्या हा विषय वर्षभर करण्याजोग नाही, असे म्हणून विभागानेह फेरविचारास नकार दिला आहे. जिर बदली झाली त्या शाळेत जाऊन आल्यावर ती चांगली नाही अरं वाटल्याने पूर्वीचीच शाळा बरी अर शिक्षकांना वाटू लागले आहे. त्यासाठ मग मूळच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाह बदली रद्दसाठी पुढे केले जाऊ लागल आहे. शाहूवाडी तालुक्यात मंगळवारं असाच एक प्रकार पुढे आला आहे.
मान्य केल्यानेच शाळा दिली
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, आम्ही कोणतीही शाळा कोणावर लादली नाही. पडद्यावर कोठे जागा रिकाम्या आहेत हे दाखवून त्यातील त्यांच्या सोयीची शाळा संबंधितांना दिली आहे आणि त्यांनी त्यावेळी ती मान्य केली आहे. आदेशही स्वीकारला आहे. दुसरे म्हणजे त्यांना त्याच वेळी बदलीसाठी नकार देण्याचा अधिकार होता; परंतु त्यांनी नकार न देता बदली स्वीकारल्याने आता याबाबत फेरविचार होणार नाही