अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची माहिती तात्काळ सादर करणेबाबत anshkalin nideshak
दिनांक १३/११/२०१७ रोजीच्या मा. न्यायालयाच्या आदेशानुसार सेवा समाप्त केलेल्या अंशकालीन कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची माहिती तात्काळ सादर करणेबाबत
संदर्भ – जा.क्र.मप्राशिप/सशि/अं.नि./२०२४-२५/२०३५ दिनांक १२/०७/२०२४ अन्वये
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये रिट याचिका क्र.८७८६/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याकरीता दि-१३/११/२०१७ रोजी आदेश दिल्यानंतर या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या आहेत. सबब, या अंशकालिन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या वेळी कार्यरत असण-या अंशकालीन निदेशकांची माहिती शासनास सादर करावयाची आहे.
सोबत दिलेल्या विहित नमुन्यात आपल्या स्तरावरून दिनांक १५/०७/२०२४ इमेल द्वारे तात्काळ माहिती विनाविलंब या कार्यालयास सादर करावी.