प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत pm crop insurance yojana 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत pm crop insurance yojana 

वाचा :१. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. प्रपीवियो-२०२३/प्र.क्र. ५२/११ ओ, दि २६.०६.२०२३

२. संचालक, कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र फ-क्र.१३०१२/१०/२०१६-क्रेडिट-॥,

दि.१५.०७.२०२४

शासन पुरकपत्र :

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दि.२६.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता सहभागाची अंतीम मुदत दि.१५.०७.२०२४ अशी निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन, योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्र. (२) येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम २०२४ मध्ये, शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तथापि, सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिध्दी व प्रचार मोहिम राबवावी.

२. सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२४०७१५१८३८३७०६०१ असा आहे. हे पूरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Leave a Comment