केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देणे बाबत मार्गदर्शन kendrapramukh promotion 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देणे बाबत मार्गदर्शन kendrapramukh promotion

केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देत असतांना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यांची सेवा ज्येष्ठता ठरवितांना कोणता दिनांक विचारात घ्यावा यासाठी मार्गदर्शन मिळणेबाबत.

संदर्भ : १. आपले पत्र क्र. जिपसा/शिक्षण/आस्था-१/कावि/२०२४, दि.१०.०७.२०२४

उपरोक्त विषयी आपले दि.१०.०७.२०२४ रोजीच्या पत्रामध्ये केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत शासनाच्या विविध शासन निर्णयामधील तदतुदी विचारात घेवून आपण केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेची कोणत्या पदाच्या नियुक्तीच्या दिनांकाबाबत या कार्यालयाकडे धारणा पक्क्की करणेबाबत कळविले आहे.

सद्यस्थितीमध्ये केंद्र प्रमुख पदोन्नती देण्याबाबत आपल्या दि.१०.०७.२०२४ रोजीच्या पत्रातील अनुक्रमांक ०७ वर नमूद

असलेला शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ मध्ये नमूद केलेनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या

प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवा

ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीत नेमणूक करणेबाबत स्वयंस्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

सबब शासन निर्णयातील तरतूदीनुसार केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीने नेमणूक करतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर वेतोन्नती झाल्याच्या दिनांकापासूनची सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ च्या तरतूदीनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीची कार्यवाही करणे योग्य ठरेल. तरी सदर प्रकरणी उपरोक्त प्रमाणे आपली धारणा पक्की करण्यात येत आहे

Leave a Comment