राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ अल्प प्रतिसादाबाबत national teacher awards 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ अल्प प्रतिसादाबाबत national teacher awards 

संदर्भ : १.शासन पत्र क्र. पीटीसी-२०२४/प्र.क्र.६०/ टीएनटी-४ दि.२९/०६/२०२४ पत्रासोबतचे सहपत्र सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.एफ.१-७/२०२४-एनएटी दि.२७/०६/२०२४

२. संचालनालयाचे पत्र क्र. क. शिसं/ online राष्ट्रीय/शिपु/२०२४/ए-२/ विद्या शाखा / ३३४४ दि.०१/०७/२०२४

३ . मा. सचिव, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.एफ.१-७/२०२४-एनएटी दि.०८/०७/२०२४

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ संदर्भात आपणांस संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. केंद्रशासनाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टल ‘वर ऑनलाईन स्वः नामांकन करण्याची मुदत २७ जून, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत आहे.

सदरील बाबत आज दिनांक ११/०७/२०२४ अखेर आपल्या जिल्हयातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२४ साठी अल्प प्रतिसाद असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ३ च्या पत्रान्वये यादीसह कळविले आहे. सोबत यादी जोडली आहे.

आपल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त आवेदने सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. राष्ट्रीय पुरस्कार-२०२४ स्वःनामांकन सादर करण्यासाठी सर्व शिक्षकांपर्यंत पुनश्चः स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करावेत तसेच वर्तमानपत्रात जाहीर करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास पाठवावा.

Leave a Comment