INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२३-२४ करीता Online नामांकने सादर करणेबाबत 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२३-२४ करीता Online नामांकने सादर करणेबाबत

संदर्भः- १) मा. नमिता गुप्ता HEAD (INSPIRE MANAK) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.DST/ INSPIRE- ΜΑΝΑΚ/ΝΟΜΙNATIONS/2024-25

विषय उपरोक्त संदर्भाकीत विषयावे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सन २०२४-२४ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.

सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online

सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Leave a Comment