केंद्रप्रमुख पदोन्नती करीता प्रशिक्षित पदद्विधर विषय शिक्षक/ मुख्याध्यापक यांना समुउपदेशनाकरीता उपस्थित राहण्याच्या सुचना देण्याबाबत kendrapramukh promotion
संदर्भ :
– १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांचे पत्र क्र.संकीर्ण २०२२/प्र.क्र ८१/टिएनटि-१ दि २७/०९/२०२३
२) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र २२०/आस्था-१४
दि. २७/१२/२०२३
३) या कार्यालयाचे पत्र क्र जिपअ/शि/कें.प्र/२०७०/२०२४ दि ०९/०५/२०२४
४) या कार्यालयाचे पत्र क्र जिपअ/शि/कें.प्र/४५८०/२०२४ दि ०६/०६/२०२४
४) पदोन्नती समितीची सभा दिंनाक ३१/०५/२०२४
५) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांची मंजुर टिप्पणी दि २८/०६/२०२४.
उपरोक्त संदर्भिय क्र.३ अन्वये केंद्रप्रमुख पदोन्नती करीता प्रशिक्षित पदविधर शिक्षक/ मुख्याध्यापक यांनी अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
संदर्भिय क्र.४ अन्वये पदोन्नती समितीने दिलेल्या सुचना नुसार उक्त सेवाजेष्ठता नुसार अनु क्र.१ ते १६० पर्यंत च्या कर्मचारी यांची कागदपत्रे मागविण्यात आली होती,
संदर्भिय क्र.३ च्या सेवाजेष्ठता यादीतील अनु.क्र. १ ते १६० पर्यतच्या कर्मचारी यांना दिंनाक ०९/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, जिल्हा परिषद, अमरावती येथे समुउपदेशानाकरीता उपस्थित राहण्याकरीता सुचना आपल्या स्तरावरुन देवुन त्यांना समुउपदेशनाकरीता उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले असल्याबाबत त्यांची नोंद स्वाक्षरीसह दप्तरी ठेवावी, समुउपदेशनास अनुउपस्थित कर्मचारी यांचा नकार समजण्यात येईल यांची नोद घ्यावी.
अमरावती जिल्हा परिषद चे पत्र pdf download
तसेच उक्त पत्रा अन्वये मागविण्यात आलेले प्रमाणपत्र, सेवापुस्ताकातील नोंदी व गोपनिय अहवालसह कनिष्ठ प्रशासन अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी समुउपदेशनाकरीता उपस्थित राहावे. सहपत्रः- १) अनु.क्र.१ ते १६० कर्मचारी यांची यादी
२) दिव्यांग कर्मचारी यांची यादी अनु.क्र.१ ते ६