सामान्य ज्ञान मराठी प्रश्न general knowledge questions
०१) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
➡️टंगस्टन
०२) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
➡️८ मिनिटे २० सेकंद.
०३) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
➡️न्यूटन.
०४) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता आहे ?
➡️रवि.
०५) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
➡️नायट्रोजन.
०६)मुख्य दिशा किती आहेत ?
➡️ चार
०७) उपदिशा किती आहेत ?
➡️चार
०८) मुख्य दिशांची नावे सांगा ?
➡️ पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
०९) उपदिशांची नावे सांगा ?
➡️ ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य.
१०) पूर्व व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
➡️ ईशान्य
११) पूर्व आणि दक्षिण यांमधील दिशा कोणती ?
➡️ आग्नेय
१२) दक्षिण आणि पश्चिम यांमधील दिशा कोणती ?–
➡️नैऋत्य
१३) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा कोणती ?
➡️ वायव्य
१४) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती?
➡️ .पूर्व
१५) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
➡️ पश्चिम
१६) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्य उजव्या हाताकडे कोणती दिशा असते ?
➡️ दक्षिण
१७) आपण पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या हाताकडे कोणती दिशा असते?
➡️ – उत्तर
१८) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते?
➡️-पश्चिम