आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेमध्ये बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment
परिपत्रक क्र. नांजिप/साप्रवि/आस्था-२क/ १६६८/२०२४ दिनांक ०१/०४/२०२४ विकास व जलसंधारण विभाग क्रमांक लोआप्र- २००२/प्र.क्र.६३/आस्था ५, दिनांक ३ ऑक्टोबर २००३.
वाचा :- १) ग्राम
२) वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक वेपुर-१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९ दिनांक २९ एप्रिल २००९.
३) सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. आवेवा-१००९/प्र.क्र.८७/०१/आठ, दिनांक ०३ जुलै २००९.
प्रस्तावना :-
वाचा मधील अ.क्र.०१ च्या शासन निर्णयामध्ये, आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यांची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शुन्य होत असल्यामुळे त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयांचा झाल्यास, ग्राम विकास विभागाकडील ३१.१०.१९८९ च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधीत कर्मचा-यांची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी, तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दि. ३१.१०.१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी. असा उल्लेख आहे.
त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने प्रस्तुत जिल्हा परिषदेमध्ये आलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा कसे ? या बाचत निर्णय घेणेकामी खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
ऑर्डर :-
वाचा मधील अ.क्र.०१ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार आंतरजिल्हा बदलीने बदलुन गेलेल्या कर्मचा-यांची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होत असल्याने त्यांना संबंधित जिल्हा परिषदेत त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढ देणे बाबतची योजना पाचव्या वेतन आयोगामध्ये अस्तित्वात आहे.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक ०१.०१.२००६ पासून शासकीय कर्मचा-यांना सुधारित वेतनश्रेणो देण्यात आली असुन वेतनसुधारणा समितीच्या शिफारशीनुसार एक अथवा दोन आगाऊ वेतनवाढ देण्याची प्रचलित योजना बंद करण्यात आलेली आहे.
सबब ज्या कर्मचा-यांची नियुक्ती सहाव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर म्हणजेच दिनांक ०१.०१.२००६ नंतर झालेली आहे व ते सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने नांदेड जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झालेले आहेत. अशा कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय ठरत नाही. त्यामुळे उक्त वाचा मधील अ.क्र. ०१ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन अशा प्रकारची आगाऊ वेतनवाढ देण्यात येवू नये.
सदरचे परिपत्रक आपले अधिनस्त सर्व खाते प्रमुख, कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे.