लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण speech on rajarshi shahu Maharaj
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी राज्यसूत्रे स्वीकारली. त्यानंतर शेती क्षेत्राला प्राधान्य देतानाच नवीन उद्योगधंदे, आधुनिक तंत्र, विद्येच्या आधारे संस्थानच्या विविध भागात उद्योग सुरू करून त्या भागांचा भौतिक व आर्थिक विकास साधावा, त्याचबरोबर जनतेला रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, या दृष्टीने पावले टाकली. त्यांच्या आदेशानुसार सन १८९५ व १८९६ या दोन वर्षांत संपूर्ण राज्याचे औद्योगिक सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण करण्यात आले. परदेशातील अनुभव व औद्योगिक सर्वेक्षण याच्या जोरावर कोल्हापूर संस्थानातील औद्योगिक प्रगतीचे नियोजन केले. या सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारे उद्योगधंद्यातील नवीन प्रयोगांना प्रोत्साहन दिले. उद्योगधंद्यासाठी लागणारे तंत्रज्ञ व कुशल कारागीर मिळविण्यासाठी प्रयत्न केले आणि उद्योगधंद्यातील विविध प्रकारचे शिक्षण लोकांना देण्याची तरतूद केली.
सुरुवातीपासूनच औद्योगिकदृष्टया उपयुक्त वस्तूंची
लागवड करण्याचे राजीं शाहूंनी प्रयत्न केले. संस्थानच्या पश्चिम भागातील डोंगरउतरणीवर चहा, कॉफीची लागवड करण्याचा प्रयोग, गंजन गवत व सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचा प्रयोग, चंदन व हिरडा यांच्या जंगलातील उत्पादनवाढीचा प्रयत्न अशा अनेक गोष्टी केल्या यातून कृषिउद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे दिसते. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण व विकास हा व्यवसायाला आवश्यक असणारे तंत्र व कौशल्य विकसित झाल्याशिवाय होणार नाही, हे ओळखून त्यांनी ‘जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिटयूट’ आणि ‘राजाराम इंडस्ट्रियल स्कूल’ या दोन तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना केली. शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे संस्थानात अनेक
उद्योगधंदे सुरू झाले. सुगंधी औषधी तेल व काष्ठार्क तेलउद्योग १९०५ पर्यंत कोल्हापूर संस्थानात सुगंधित औषधी तेलउद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्ठार्क उद्योग आणि सुती कापड उद्योग सुरू केले होते. देशाच्या विविध भागांत त्या-त्या उद्योगांचे प्रशिक्षण घेण्यासाठी महाराजांनी माणसे पाठविली. तसेच गरजेनुसार बाहेरील प्रशिक्षित माणसे आपल्या संस्थानात नेमली. जपानमध्ये प्रशिक्षित झालेले डी. एस. शाळिग्राम या रसायनतज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक आपल्या संस्थानात ‘इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर’ म्हणून केली होती. शाळीग्राम यांनी ‘सुगंधी औषधी तेल उद्योग’ तसेच ‘काष्ठार्क तेल उद्योग’ या क्षेत्रांत प्रायोगिक तत्वावर काही वनौषधी तेलांचे व काष्ठाकांचे यशस्वी उत्पादन सुरू केले होते. त्याकाळी मुंबईमध्ये भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात कोल्हापूर संस्थानात उत्पादित झालेल्या अशा प्रकारच्या तीन सुगंधित औषधी तेलांचे नमुने पाठविले होते. विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनात ही कोल्हापुरी तेले तज्ज्ञांच्या प्रशंसेस पात्र
ठरून कोल्हापूर संस्थानास चांदीचे पदक बहाल केले होते. सन १९०४-०५ चा कोल्हापूर संस्थानचा प्रशासनिक अहवाल सांगतो की, तेथील तज्ज्ञ परोक्षकांनी आपल्या ‘ऑफिशियल गाईड बुक’ मध्ये या तेल उत्पादनाचे कौतुक केल्याचे आढळते. काष्ठार्क तयार करण्याचे प्रयोग पुढे अनेक वर्षे सुरू होते. म्हैसूरच्या औद्योगिक प्रदर्शनातही तज्ञांनी कोल्हापूर संस्थानाला चांदीचे पदक दिले होते. कोल्हापुरात कापड गिरणी सुरू करण्यावर शाहू महाराजांनी विशेष भर दिला. त्यासाठी १९०५ मध्ये स्थापलेल्या कंपनीला सरकारी मान्यता दिली आणि विविध सोयी व सवलती दिल्या. ‘दि शाह छत्रपती स्पिनिंग अॅड विव्हिंग मिल्स’ या अधिकृत नावाच्या पण ‘शाहू कापड गिरणी’ या नावाने ओळखल्या जाणा-या कोल्हापूर संस्थानातील पहिल्या आधुनिक कापड गिरणीचे उदघाटन त्यांच्या हस्ते दसऱ्याला झाले. भाषणात त्यांनी “औद्योगिक विकास साध्य करण्याच्या उद्देशपूर्तीसाठी दसरा साजरा करण्यात यावा,” अशी इच्छा प्रकट केली. या कापडगिरणीबरोबरच छत्रपती शाहू महाराज यांनी सन १९०८ मध्ये संस्थानच्या रायबागमधील हातमाग चालवणा-या संस्थांना आर्थिक व अन्य मदत करून प्रोत्साहन दिले. १९०९ मध्ये लक्ष्मणराव कोरगावकर यांना गडहिंग्लज येथे नवी जिनिंग फॅक्टरी सुरू करण्यासाठी जागा दिली. १९१२ मध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात विजेचा पुरवठा करण्यासाठी श्री. उपळावीकर यांना २५ वर्षांपर्यंत
मक्तेदारीची सवलत दिली.
संस्थानात प्रवासी व माल यांच्या वाहतुकीसाठी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर १९१२ मध्ये “दि कोल्हापूर मोटर सर्व्हिस नावाची कंपनीही महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालो, सन १९१२-१३ मध्ये रायबाग येथे ‘शाह वीव्हर्स असोसिएशन’ या नावाची संस्था स्थापन करून
धंद्यात अपयश आलेले अनेक विणकर, कामगार गार सोडून विखुरले होते, त्या सर्वांना एकत्र आणले. १६० स्वी- पुरुष विणकर या संस्थेचे सभासद होते. विणकरांनं गाव सोडू नये यासाठी त्यांना बिनव्याजी कर्ज दिले राहण्यासाठी जागा दिली. रयतावा जमीन दिली. तेरे साड्या, धोतरे, खण, चादरी तयार होत, तयार मालाल दरबार मागणी कमी पडू देणार नाही, अशी स्पा हमीसुद्धा महाराजांनी दिली होती. राजर्षी शाहूंची प्रेरण व सहकार्यातून त्या काळात रंगाचे कारखाने, राळ तया करण्याचा व्यवसाय, कात कारखाना, सूत रंगवण्यारे व्यवसाय, तेल गिरण्या असे व्यवसाय सुरू झाले होते.
‘आर्थिक संपन्नता औद्योगिकीकरणावर अवलंबू
आहे,’ असे महाराजांचे मत होते. औद्योगिक विकार करताना शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये, याकडेहं त्यांचा कटाक्ष होता. राजाराम इंडस्ट्रियल स्कूल, शोरूम व बोर्डिंग हाऊसच्या उदघाटनप्रसंगी महाराज म्हणतात “औद्योगिक विकासाशिवाय देशाला तरणोपाय नाही देशाच्या दृष्टिकोनातून औद्योगिक विकास दुहेरी महत्वाच आहे. एक म्हणजे औद्योगिक विकासामुळे आपल्याल आपली साधन संपत्ती, राष्ट्रीय उत्पन्न व व्यापार वाढवित येतो. दुसरा जास्त महतत्त्वाचा घटक म्हणजे शहरी ग्रामीण भागात कारखाने निघाल्यास तिथल्या लोकांन रोजगारही मिळवून दिला जातो…’
निसर्गाचे वरदान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं प्रेरणा, प्रोत्साहन आणि कष्टाळू लोक यांच्या त्रिवेणं संगमातूनच कोल्हापूरच्या उद्योगविश्वाने केवळ महाराइ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या औद्योगिक विश्वार आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.
मधुमक्षिका पालनाचे जनकत्व
• संस्थानच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगररांगावरील वनश्री बारमास फळाफुलांनी
नटलेली होती. या निसर्ग पार्श्वभूमीवर आपल्या संस्थानात मधुमक्षिकापालन उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांना तो जोडधंदा म्हणून करता येईल, असे महाराजांना वाटत होते. त्यासाठी संबंधित उद्योगाविषयी माहिती घेण्यासाठी चिटणीस नावाच्या आपल्या अधिकाऱ्यास कोलकत्यातील ‘डायरेक्टर ऑफ अॅग्रिकल्चर’ कडे धाडले होते. पण तेथे निराशा पदरी पडली, कारण त्यांच्याकडे वा उद्योगाचे प्रशिक्षण देण्याची यंत्रणा नव्हती. निराश न होता शाहू महाराजांनी हा उद्योग आपल्या संस्थानात सुरू केला आणि हिंदुस्थानातील या उद्योगाचे जनकत्व कोल्हापूरला प्राप्त करून दिले.