जिल्हा परिषद अतंर्गत करावयाच्या भरतीपूर्व जिल्हातंर्गत बदली प्रक्रीया राबविण्या बाबत teacher request transfer
संदर्भ:-1
. शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्रमांक: ZIPB-4820/P.No.290/Astha-14 दि. ०७/०४/२
2. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांक संकुचित-2023/174/TNT-1 दिनांक 21/06/2
3. मा. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव, 06/03/2024 चे पत्र क्र. नॅरो-2023/P.No.174/TNT-1
4. विविध शिक्षक संघटनेचे निवेदन
उपरोक्त संदर्भिय क्रं.02 शासन निर्णयातील नमुद केल्याप्रमाणे जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासून कर्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापुर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील यांची दक्षता घेण्या बाबत निर्देश नमुद आहेत.
त्यानुसार संदर्भिय शासन निर्णय क्रं. 02 च्या अनुषंगाने शिक्षकांच्या विनंती बदली प्रक्रीयेसाठी संदर्भिय क्रं.01 शासन निर्णयातील नमुद केलेल्या विनंती बदली कालावधी पुर्ण करत असलेल्या विनंती बदलीसाठी इच्छुक शिक्षकांचे विनंती बदलीचे अर्ज सबळ पुराव्यानिशी आपले कार्यालयात दिनांक 26/6/2024 पर्यंत सांयकाळ 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात यावेत. तसेच संच
मान्यता सन 2022-23 मध्ये तालुकास्तर/जिल्हास्तरावरील समायोजन प्रक्रीया रद्य झाल्याने समायोजन प्रक्रियेतील बदली इच्छुक शिक्षकांचे विनंती बदली अर्ज स्विकारुन एकत्रीत माहीती या कार्यालयास सादर करण्यात यावी.
विहित मुदतीमध्ये आलेले अर्ज सबंधीत गटशिक्षणाधिकारी एकत्रीत माहिती तयार करुन दिनांक 26/6/2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रस्तुत कार्यालयास सादर करावी. विहित केलेल्या कालावधीनंतर प्राप्त अर्ज/माहिती स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.
तसेच जे शिक्षक विनंती बदलीसाठी अर्ज देणार नाहीत अश्या शिक्षकांचा सदर विनंती बगली प्रक्रीयेमध्ये विचार केला जाणार नाही.
I want transfer