राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त 600 शब्दात मराठी भाषण marathi speech on rajarshi shahu Maharaj
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे बाल मित्रांनो आज आपण आपल्या शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.
आपण आज कर्तव्यदक्ष आरक्षणाचे जनक बहुजनांचा आधार कुशल व्यवस्थापक जलनिती तज्ञ राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत.
आज जर छत्र राजर्षी शाहू महाराज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रूप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झालेले आहे.
आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे 19 व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पी त्याचे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू महाराजांनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील केशवराव जेधे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाच्या रूपाने पुढील काळात नवनवीन पालवी फुटली शेकडो वर्षात ज्ञान सत्ता संपत्ती यापासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानी जगता यावे शिक्षण घेता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात साठी राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर कार्य केले.
राजर्षी शाहू महाराजांची व्यक्तिमत्व तपासण्यासाठी आज आपण लेखनाच्या उत्पत्त्या वापरतो परंतु या लेखनाच्या फुटपट्ट्यांनी या माणसाचे जीवन चरित्र तपासता येईल का हा मोठा प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराज हे लेखनाचे विषय मर्यादित नाहीत त्यांचे कर्तृत्व हे संत तुकाराम यांच्या भाषेत सांगायचे झाले तर खूप मोठे आहे.
राज घराण्यात राहून सुद्धा लोकांसाठी जगलेला हा माणूस नुसता राजा म्हणून जगला नाही तर लोकराजा रयतेचा राजा ठरला
शिवरायाचे वंशज म्हणून जगताना ‘छत्रपती’ ही बिरुदावली नुसती लावली नाही तर खऱ्या कर्तृत्वाने सार्थ केली. ‘छत्रपती, राजर्षी शाहू महाराज’ हे लांबलचक बिरूद घेवून अद्यापही शे- सव्वासे वर्षांपासून अनेकांच्या मनाचा ठाव घेत शाहू महाराज सर्वसामान्यांकरिता अजूनही जिवंतच आहे; नव्हे, आम्ही ते त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध करू शकतो. म्हणूनच तर, शाहू महाराजांच्या त्या कर्तृत्वाला, त्या विचारांना केवळ मुजरा म्हणून नव्हे; केवळ सलाम म्हणून नव्हे; प्रणाम म्हणून नव्हे तर त्यांच्या विचारांना जोपासावे म्हणून, त्यांचे विचार अधिकाधिक अभ्यासले जावे म्हणून, त्याच्या तत्कालिन कार्याचे उपयुक्तपण कसे लागू होईल? ते कळावे म्हणून, त्यांच्या निर्णयप्रक्रियांचा ठामपणा आजच्या तकलादू विचारांच्या विचारवंतांना कळावा म्हणून, त्यांच्या प्रशासन व्यवस्थेतील ‘दूरदृष्टीपणा’ आजच्या शासनप्रशासन व्यवस्थेला ज्ञात व्हावा म्हणून आणि त्यांनी दीपवून जावे म्हणून, त्यांनी त्याकाळात केलेल्या सुधारणा आजच्या एकविसाव्या शतकात फक्त ‘साक्षर’ होवून नुसते ऐषोरामी जीवन जगत असलेल्या पिढीला डोळे उपडे करून तपासता याव्या म्हणून त्यांचे विचार अभ्यास ले पाहिजेत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, – मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले. त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्काबंद, मुलांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारीत्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुर्नविवाह कायदा आणणे, मूलगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणीव्यवस्था पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी हे उरिष्ट्ये पेवून शाहू महाराजांनी ‘नव्या सामजिक क्रांतीचा’ पुरस्कार केला, शिक्षणाची संकल्पना, जानवार नेतृत्व स्वाबलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णूता, देशप्रेम इत्यादी गुणासाठी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतीगृहे, शिष्यवृत्ती, शाळा व नोकरीत राखीव जागाची तरतुद, जातीप्रथेला विरोध, वेठबिगारीला विरोध, स्त्री शोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणूण सामाजिक सुधारणा, बंधुभाव, शिक्षण, कृषी, उद्योग, कला या क्षेत्रात केलेले लोककल्याणकारी कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास
उपयुक्त आहे. त्यामुळे अश्या राष्ट्रपुरुषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही. म्हणून या थोर माणसाच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
एवढे बोलून मी माझे भाषण समाप्त करतो .