सन २०२३-२४ या शै.वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत sanchmanyata
संदर्भ : दि.१६.०२.२०२४ रोजी मा. सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांनी राज्य मंडळ पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सुचना
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करण्याबाबत दि.१६.०२.२०२४ च्या बैठकीमध्ये सुचित करण्यात आलेले आहे.
त्यानुषंगाने संच मान्यतेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. आपल्या जिल्हयातील तालुक्यांच्या दिनांका दिवशी आपण सकाळी १०.३० ते ६.०० यावेळेत उपस्थित राहुन आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन घ्यावी.
टप्पा क्रमांक :-१
१. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (माध्यमिक) जिल्हा परिषद पुणे/अहमदनगर/सोलापूर यांनी दिनांक ०७.०३.२०२४ पर्यंत आधार व्हॅलीड संख्येनुसार करण्यात यावी. टप्पा क्रमांक :-२
१. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबधित जिल्हयाच्या सहा. शिक्षण उपनिरिक्षक यांच्याकडुन शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अद्ययावत केलेले जनरल रजिस्टर प्रमाणे तपासुन घ्यावीत. व त्याचे प्रमाणपत्र संबंधित सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावा सोबत सादर करावेत.
२. सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी शाखानिहाय तुकडीनिहाय तपासलेली विद्यार्थी संख्या आणि सरल
प्रणालीमध्ये नमुद केलेली विद्यार्थी संख्या एकसारखी असणे आवश्यक आहे. ३. संच मान्यतेसोबत शैक्षणिक वर्ष २०१३-१४,२०२१-२२ व २०२२-२३ ची संच मान्यतेची प्रत सादर
करावी.
४. कनिष्ठ महाविद्यालयाचे शाखानिहाय वेळापत्रक सादर करावे.
५. विद्यार्थी निहाय/विषय निहाय शिक्षकांना दिलेला कार्यभाराचा तक्ता शिक्षकांच्या नावांनिशी व प्रकारानिशी सादर करावा. (परिशिष्ट-अ). (सोबत बिहित नमुना जोडलेला आहे).
६. माध्यमिक विभागाकडील कार्यभार देऊन उच्च माध्यमिककडील पदे पुर्णवेळ करु नयेत, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विभागाकडील कार्यभार माध्यमिक विभागाकडे देऊ नये.
७. प्रस्तावा सोबत विद्यार्थी संख्या (सरल प्रणाली २०२३-२४ च्या हार्ड कॉपीसह सादर करावी, त्याशिवाय संच मान्यता केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
८. सन २०२३-२४ च्या संच मान्यतेसाठी सरळ प्रणालीमधील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या धरुनच संचमान्यता करण्यात येणार असल्याने ऑनलाईन आधार व्हॅलिड रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे.
९. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची संच मान्यता वावत, कॉलेज निहाय डाटा व सांख्यिकी माहिती शासनास हवी असल्यामुळे प्रत्यक्ष शिवीराच्या ठिकाणी संगणकावर ऑनलाईन माहिती भरुन त्यानंतरच संच मान्यता प्रत प्रिन्ट काढावी. त्याकरिता आवश्यक ती सर्व माहिती घेऊनच उपस्थित रहावे.
१०. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेचे कार्यरत असलेले संचालक मंडळ त्यांचा कार्यकाल, व मा.धर्मादाय आयुक्त, यांचे परिशिष्ट अ ची साक्षांकित प्रत / बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) प्रत सादर कराबी.
११. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुर्णवेळ अर्धवेळ/प्र.घ.ता नियुक्तीबाबत कोणताही वाद/न्यायालयीन प्रकरण सुरु नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचार्य यांनी सादर करावे.
१२. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पूर्णवेळ / अर्धवेळ/प्र.घ.ता नियुक्तीबाबत कोणताही वाद/न्यायालयीन प्रकरण सुरु असल्यास प्रकरण नियुक्ती/नियुक्ती रड करणेबाबत / संचालक मंडळातील बादाबाबत आहे, याची थोडक्यात माहितीची प्रत सादर कराबी
१३. संस्थेत बाद असल्यास सादर केलेल्या प्रस्तावातील सर्व माहिती ही बिनचूक/ बरोबर असल्याबाबत प्राचार्य यांनी हमीपत्र सादर करावे, त्याचप्रमाणे संस्थेतील बादामुळे प्राचार्य यांनी त्यांच्या अधिकारात केलेल्या सर्व नियुक्त्यांबाबत प्राचार्य व्यक्तिशः जबाबदार असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
१४. प्राचार्य यांनी सादर केलेल्या माहितीबाबत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण/तक्रारी उद्भवल्यास त्यास प्राचार्य व्यक्तिशः जबाबदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. १५
. शिबीराच्या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने तयार केलेली संच मान्यता प्रत तपासल्यानंतरच अंतिम प्रती ०४ काढण्याबाबत आदेशित केले जाईल. (पटपडताळणी व संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०२३ ची विद्यार्थी संख्या ग्राहय धरावी)
१६. माहे फेब्रुवारी २०२४ पेड इन मार्च २०२४ चे बेतन देयकाची प्रत सोबत आणावी. तसेच खालील प्रपत्र अ मधील माहिती अचूक भरुन प्राचार्यानी त्यांची पडताळणी करुन स्वाक्षरी व शिक्यासह सादर करावी.