प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करणेबाबत संपुर्ण बदली प्रक्रिया वेळापत्रक व रिक्त जागांचा अहवाल teacher request transfer
उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरुन, शालेय शिक्षण विभागाकडील दि. २१/६/२०२३ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राजर्षि शाहू सभागृह (शासकीय विश्रामगृह) ताराबाई पार्क कोल्हापूर येथे होणार आहेत.
बदलीचे ठिकाणी सबंधित शिक्षकांनी आपली वाहने शासकीय विश्रामधाम आवारात आणू नयेत तसेच सदर बदलीसाठी संबंधित शिक्षकांना बदलीकामी हजर राहणेसाठी खालील वेळेमध्ये हजर राहणेसाठी आपले स्तरावरुन. कळवणेत यावे. तसेच विषय शिक्षक / पदवीधर शिक्षक यांनी समुपदेशनला येताना विषय शिक्षक / पदवीधर शिक्षक नियुक्तीचा आदेशाची सत्य प्रत सोबत घेवून येणेचे आहे.