जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न shala praveshotsav
15 जून 2024 रोजी शाळेमध्ये इयत्ता पहिली मधील प्रवेश पात्र विद्यार्थी नवागतांचे स्वागत कार्यक्रम ,मोफत पुस्तक वाटप मोफत, मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम व शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन चे आयोजन करण्यात आले होते .
इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये २१ विद्यार्थी प्रवेश झाले असून इयत्ता पहिली ते चौथी च्या वर्गामध्ये इंग्रजी /खाजगी माध्यमांमधून प १५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना वाजत गाजत स्वागत करण्यात आले .माता पालक मेळावा शाळा पूर्व तयारी मेळावा अंतर्गत नव्याने दाखल विद्यार्थी ७ टेबलवर तपासणीचा कार्यक्रम संपन्न झाला . विद्यार्थी माता पालक यांच्या उपस्थिती मध्ये विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला .
शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षक सौ सुनिता शिंदे सौ मनीषा चव्हाण या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंद निर्मितीसाठी सेल्फी पॉईंट आवर्षक टेबल मांडणी केली होती . विविध प्रकारचे खेळ चेंडू फेक लगोर दोरी उडया शारिरीक बौद्धिक भावनिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी पडताळणी करण्यात आली .माता पालक गटाच्या स्मार्ट माता पहिली मधील दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या माता सर्वांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी छान प्रकारे प्रतिसाद दिला .
माननीय शिक्षणाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून श्री सस्ते सर यांचे मित्र कै .सोपान तुकाराम जरांडे यांचे पुत्र श्री निलेश सोपान जरांडे ( बांधकाम विभाग इंजिनियर ) बारामती यांच्या मार्फत ४८०० रुपयांच्या वह्या वाटप करण्यात आल्या . तसेच दिलीप माधवराव जगताप माजी सेवानिवृत्त डीसीपी मुंबई यांनी ११३५० रुपयांच्या वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या .श्री उदय खलाटे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली . शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले . स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचे लोकसभागातून कमी पडणारे मानधन देण्याची घोषणा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळेत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जाणार असून त्याचे कमी पडणारे मानधन दरवर्षी प्रमाणे याही वर्षात शिक्षक स्टाफच्या वतीने देण्यात येईल . इ १ ली नविन वर्ग दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी रोजी सुरु होईल सदर वर्गात अश्विनी खरात मार्गदर्शन करतील त्याचे विद्यार्थी तयारी मोफत करून देणेबाबत माहिती दिली .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे गेले ६ वर्ष विविध उपक्रम विद्यार्थी हितासाठी राबवत असताना स्पर्धा परीक्षा अबॅकस बाल संस्कार वर्ग असे विविध उपक्रमांची अंमलबजावणी करून विद्यार्थी विकासास प्राधान्य दिल्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा मधून विद्यार्थी चमकताना दिसून येतात . त्यामुळेच चालू शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेमध्ये फलटण मधून नामांकित शाळांमधून शाळेमध्ये प्रवेश झाले आहेत . विद्यार्थ्यांच्या मध्ये अपेक्षित वर्तन बदल सर्वांगीण गुणवत्ता वाढ विकास बाबत, वर्षभर राबवायचे विविध उपक्रम , सहशालेय उपक्रम स्पर्धा परीक्षा तयारी याबाबत संपूर्ण माहिती मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी माता पालक वर्ग उपस्थित पालक यांनी दिली .
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ शितल कुंभार, सदस्य सौ सीमा खलाटे , सौ कोमल हवालदार दिपाली खरात, चैत्राली वाघमारे, प्रियंका वाघमारे ,काजल शेख, वीणा चव्हाण, शुभांगी धोत्रे, गौरी आडके ,दिपाली काकडे, शुभांगी कुंभार ,अनिता आडके, पल्लवी इंगळे , सोनम साळवे ,प्रियांका जगताप ,अश्विनी खरात नम्रता धुमाळ, रोहिणी भंडलकर, आयशा पठाण ,वैशाली पोंदकुले, दिपाली लांडगे ,ज्योती सौ स्वाती ज्योति,,स्नेहा फरीदा शेख ,सौ पवार अंगणवाडी ताई मदतनीस सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .
शाळा प्रवेशोत्सव व शुभारंभ कार्यक्रमासाठी सरपंच सौ मंदाकिनी कानडे उपसरपंच श्री गिरीश खलाटे सर्व सदस्य पालक ग्रामस्थ सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पंचायत समिती बारामतीचे गटशिक्षणाअधिकारी श्री संपतराव गावडे साहेब,विस्तार अधिकारी श्री संजय जाधव साहेब केंद्रप्रमुख सौ शोभा सावंत मॅडम या सर्वांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या .