भारत टॅलेट सर्च २०२४ परीक्षेत जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर च्या विद्यार्थ्याचा राज्य गुणवत्ता यादीत सामावेश bharat talent search exam
मार्च २०२४ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेच्या यशाचा चढता आलेख
इ १ ली – (१५० पैकी )
देवराज उदय खलाटे९२ गुण राज्यात ४ था
अद्वय विनोद घोरपडे -९० गुण राज्यात ५ वा
आदित्य महादेव कुंभार८ ८ गुण राज्यात ६ वा
आयुष अक्षय लांडगे ८ ८ गुण राज्यात ६ वा
खुशी चंद्रकांत धोत्रे ८ ६ गुण राज्यात ७ वी
शरण्या गिरीष तांबे८ ४ गुण राज्यात ८ वी
आल्फिया अब्दुल शेख८ २ गुण राज्यात ९वी
आरोही अजित खुडे ८ २ गुण राज्यात ९ वी
इ २ री – (१५० पैकी )
श्रीतेज निलेश चव्हाण ८ ८ गुण राज्यात ६ वा
मार्च २०२४ रोजी झालेल्या BTS स्पर्धा परीक्षा मध्ये शाळेतील ९ विद्यार्थी राज्याच्या मेरीट मध्ये अव्वल होऊन यशस्वी झाले .
शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्ज उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे सौ मनिषा चव्हाण या सर्वांच्या प्रयत्नातून व माता पालक वर्गाचे सहकार्य यामधून विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा मधून अव्वल होत आहेत .
इ १ ली ते ४ थी च्या वर्गांना कोणत्याही स्पर्धा परीक्षा नाहीत केवळ शासकीय अभ्यासक्रम शिकवला म्हणजे झाले असे होत नाही .स्पर्धेच्या युगात ग्रामिण भागतील मुले टिकवण्यासाठी पालक शिक्षक सहसंबंधातून विद्यार्थी हितासाठी अनेक उपक्रम राबवत असताना सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादातून गुणवत्ता विकास साध्य होताना दिसून येतो .
१५ जून पासून शाळा शुभारंभ होत असून पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जागृकता बाळगणे आवश्यक आहे . केवळ महागड्या फी भरल्या , विद्यार्थी टापटीपणे गेला म्हणजे गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळेलच असे नाही . विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून आवश्यक असून बालवयात विद्यार्थी हसत खेळत शिक्षणावर पालकांनी भर दिला पाहीजे असे मत मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी व्यक्त केले .
_राज्यभरातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश_
एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा ( BTS ) 2024 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. NEP 2020 शी सुसंगत, NCF 2023 मधील मार्गदर्शक तत्वांवर आधारित व थीम बेस अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील ही एकमेव परीक्षा असून संपूर्ण राज्यातून विद्यार्थ्यांचा भरघोस असा प्रतिसाद परीक्षेला मिळाला होता . राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 250 पेक्षा अधिक केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेत, इयत्ता 1 ली ते 8 वी चे मराठी माध्यमाचे 20 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील सर्व इयत्तांमध्ये राज्य स्तरावर इज्युमिट अकॅडमीच्या ठरवलेल्या निकषानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो संस्थेची अभ्यास सहल घडवली जाणार आहे. याव्यतिरिक्त जिल्हा व केंद्र स्तरावरही विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
एज्युमिट अकॅडमी व भारत टॅलेंट सर्च परिवाराच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. संपूर्ण निकाल व गुणवत्ता यादी पाहण्यासाठी अकॅडमीच्या www.btsedumeet.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे.
शाळेच्या यशाबद्दल पदाधिकारी ग्रासस्थ पालक यांनी अभिनंदन केले . शाळेच्या विविध उपक्रम मधून पटवाढ होत असून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा टिकवण्यात यश व पालकांचा विश्वास गुणवत्तेत पालक सहभाग यामुळे शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री संपतराव गावडे साहेब, विस्तार अधिकारी श्री संजय जाधव साहेब, शिरवली केंद्राच्या आदर्श केंद्रप्रमुख सौ शोभा सावंत यांनी शुभेच्छा दिल्या .