‘सगेसोयरे ‘साठी सरकारचे प्रयत्न सुरू:उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती मराठा आरक्षणासाठी समन्वय साधण्याचे कामmaratha aaraksha
मुंबई, दि. 12 – मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या संदर्भात सरकार संवेदनशील आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणा संदर्भातदेखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्ही समाजांशी समन्वय साधण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आपण स्वतः या संदर्भात ओबीसी नेत्यांशी चर्चा केली असून मराठा समाजाला सगेसोयरेतून आरक्षण दिल्याने ओबीसींचे कसल्याही प्रकारचे नुकसान होत नाही असा दावाही त्यांनी केला आहे.
सुरू केलेल्या उपोषणा संदर्भात राज्य सरकार गंभीर्याने विचार करत आहे. त्यांना सरकारच्या वतीने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू आहे. जाळपोळी व्यतिरिक्त मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू आहे. तसेच सगेसोयरे संदर्भातली पहिली नोटिफिकेशन राज्य सरकारने जारी केली आहे. या संदर्भात आक्षेप मागवण्यात आले आहेत. तसेच ओबीसी नेत्यांशी देखील मी स्वतः चर्चा करत