शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळणेबाबत teacher transfer
: रिट याचिका क्र. 424C / 20 ?3 व अन्य याचिंकामध्ये मा. उच्च न्यायालय, नागपूर यांनी दि. ४.१२.२०२३ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये याचिकाकर्त्या शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळणेबाबत
संदर्भ :
१) शासनाचे समक्रमांकीत दि. १५.५.२०२४ रोजीचे पत्र.
महोदय,
२) आपली दिनांक २१.५.२०२४ व दि. २९.५.२०२४ रोजीची पत्रे.
उपरोक्त संदर्भ क्र. २ वरील आपल्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, यातील मुद्दा क्र. १ (server availability) व २ (Renewal of SMS and email work order) बाबत (शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्यासाठी येणारा एकूण १ वर्षासाठीचा खर्च) यानुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत आपणास कळविण्यात येईल. दरम्यान, शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी सर्वर अनुषंगिक बाबींची पूर्तता करून तात्काळ पोर्टल सुरू करण्याची कार्यवाही करावी तसेच जिल्हा परिषद अमरावती करिता तात्काळ पोर्टल उपलब्ध करून द्यावे. सदर बाब तातडीची समजण्यात यावी. तसेच मुद्दा क्र. ३ व ४ बाबत जिल्हा परिषद, अमरावती यांचेकडून तातडीने माहिती उपलब्ध करून घ्यावी. जिल्हा परिषद, अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच मुद्दा क्र. ५ बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरू करण्याच्या सूचना आपणास संदर्भीय क्र. १ वरील पत्रान्वयेच देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.