उष्णतेमुळे या जिल्हयात जमावबंदीचे आदेश क्लासेसच्या वेळांवर निर्बंध heated environment
ज्याअर्थी, सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात तापमान 43 deg * C ते 47 deg * C असे असून तापमानाचा पारा चढता असल्यामुळे उष्णतेची लाट भडकली असल्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालेला असून उष्माघातामुळे सर्वसामान्य नागरिकांना, कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये या करीता खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे, कामगारांना आवश्यक सेवा पुरविणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे.
त्याअर्थी, मी आयुष प्रसाद, जिल्हादंडाधिकारी जळगाव मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगाव जिल्ह्यात दिनांक 25/05/2024 रोजी सकाळी 00.01 वाजेपासून ते दिनांक 03/06/2024 रोजी 24.00 वाजेपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 चे आदेश लागू करण्यात येत असून खालील प्रमाणे आदेशीत करण्यात येत आहे.
1) उक्त नमूद कालावधीत अंगमेहनत करणा-या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही.
2) ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे, कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करुन घेण्याची जबाबदारी संबंधित मालकांची राहील, याबाबत काहीएक तक्रार असल्यास ती संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलीस विभाग यांचेकडेस करता येईल.
3) खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10.00 वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चाललवावेत. तद्नंतर सकाळी 10 ते 5 या वेळेत कोचिंग क्लासेस सुरु ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर मध्ये पुरेसे पंखे, कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील.
जळगांव जिल्हाधिकारी यांचे आदेश 👇
अकोला जिल्हाधिकारी यांचे आदेश 👇