5 जून जागतिक पर्यावरण दिनावर आधारीत 500 शब्दात निबंध essay on international environment day
प्रथमतः जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन खास दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करतो सर्व जगामध्ये शंभरहून अधिक देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन साजरा करणे वरचा उद्देश हा आहे की जगातील सर्व लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून जागरूकता आणणे लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे व पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करणे हा या मागचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे.
जागतिक पर्यावरण दिन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP युनिक याद्वारे चालवला जातो सन 1973 पासून हा दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यावरणाची खरी सुरुवात 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने पाच जून ते 16 जून या कालावधीमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत केली होती पहिला जागतिक पर्यावरण दिन पाच जून 1973 रोजी साजरा करण्यात आला पर्यावरणाच्या जैविक घटकांमध्ये सूक्ष्मजीवांपासून कीटक प्राणी वनस्पती आणि सर्व जैविक क्रिया कल्पक आणि त्यांच्याशी संबंधित प्रक्रियांचा समावेश केला गेला.हा दिन साजरा करण्याचा मागचा खरा उद्देश म्हणजे जनजागृती संवर्धन रक्षण होय.
जगामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे तसेच शेतीचा देखील त्रास होत आहे वेगवेगळ्या औषधांच्या फवारणीमुळे मातीचे देखील नाश पावत आहे अशा या वातावरणामध्ये जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्लोबल वार्मिंग चे परिणाम दिसून येत आहेत या परिणामामुळे जागतिक तापमानामध्ये देखील वाढ झालेली दिसून येते उन्हाळ्यामध्ये तारा 45 ते 48 अंश च्या वर गेलेला आपल्याला दिसायला मिळतो पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे थंडीमध्ये थंडी देखील कमी लागत आहे हा सर्व परिणाम म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे मोठे कारण आहे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम टाळण्यासाठी विविध प्रतिबंध हे करणे गरजेचे आहे. ग्लोबल वार्मिंग हे आपल्या पर्यावरणाच्या नासाचे मुख्य कारण आहे आपल्याला सर्वांना माहीत असून देखील आपण याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले काळाची गरज आहे आणि त्याचा नाश करणारे सर्व सोशल थांबवणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काय करू शकतो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण आपल्या कामातून एक दिवस सुट्टी घ्यायला पाहिजे आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती केली पाहिजे विविध उपाययोजना केल्या पाहिजेत विविध उपक्रम उपक्रमांमधून लोक जागृती करायला पाहिजे तसेच जमिनीवर झाडांची लागवड करायला पाहिजे विविध रोपे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे फक्त झाडे लावणे म्हणजे पर्यावरण संवर्धन नाही तर ते झाडे जगवणे हे देखील आपले कर्तव्य समजून आपण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आपण जर आज लहान रोपटे लावले तर त्याचा मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर होईल पर्यायाने आपल्या येणाऱ्या पुढील पिढींना त्याचा चांगला फायदा होईल आणि जर आपण याकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या पिढीला खूप मोठी हानी पोहोचेल.
जनजागृती करण्यासाठी खालील मोहिमा आपण राबवू शकतो
पर्यावरण रक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे लोकांमध्ये जागृती आणू शकतो पर्यावरण संवर्धन कसे करावे यासाठी आपल्या शाळांमध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात तसेच ग्रामपंचायत पंचायत समितीच्या माध्यमातून देखील आपण त्याचे महत्त्व लोकांना पटवून देऊ शकतो.
पर्यावरण रक्षणाचे शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना धडे देऊन देखील आपण पर्यावरण याचा रास काढू शकतो शालेय अभ्यासक्रमामध्ये देखील पर्यावरण रक्षणाची संवर्धनाचे धडे दिले जाऊ शकतात त्यातून देखील मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊ शकते.
पर्यावरणामध्ये अनेक घटक येतात ज्यामध्ये नैसर्गिक घटक आणि नसर्गिक घटक तसेच सजीव निर्जीव यामध्ये वनस्पती प्राणी पक्षी पर्वते डोंगरे झाडे दऱ्याखोऱ्या नद्या समुद्र यांचा मिळून खऱ्या अर्थाने पर्यावरण बनत असते आणि या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी रक्षण करण्यासाठी मानवाने स्वतः पुढे येणे काळाची गरज आहे ज्या प्रकारे आपण आपली जबाबदारी स्वीकारल्यानंतर खऱ्या प्रकारे जलप्रदूषण रोखण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करू शकतो जलप्रदूषणामुळे मानवी जीवन उध्वस्त होऊ शकते त्यामुळे कारखान्यांमधून निघणार खराब पाणी तसेच घरातील केरकचरा प्लास्टिक यांचा वापर कमी करून आपण पर्यावरण संतुलन राखू शकतो तसेच नदीमध्ये कपडे धुणे जनावरे धुणे इत्यादी गोष्टी आपण टाळू शकतो.
झाडे ही आपली मित्र आहेत प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे आणि त्या झाडाचे संरक्षण संवर्धन केले पाहिजे आपल्या वाढदिवसाला प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे हा उपक्रम आपल्या गावामध्ये शाळेमध्ये राबवला पाहिजे जेणेकरून झाडांची संख्या वाढवण्यास मदत होईल व पर्यायाने पर्यावरण संवर्धन होण्यास देखील मदत होईल अशा प्रकारे पर्यावरण दिन साजरा करून आपण एक जगात आपले उदाहरण तयार करू शकतो