इयत्ता ५ वी व ८ वी परीक्षा पास होणे बंधनकारक 5th and 8th class board exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता पाचवी व आठवी परीक्षा पास होणे बंधनकारक 5th and 8th class board exam

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी चा शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष 202324 पासून इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे

या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता पाचवी आणि आठवी साठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश आहेत.

सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता पाचवी ला प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता आठवी साठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र हे विषय असतील तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन दोन म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे

Leave a Comment