इयत्ता ५ वी व ८ वी ची वार्षिक परीक्षा दोन एप्रिल पासून शाळा स्तरावर होणार 5th and 8th board exam
शैक्षणिक वर्ष 2023 24 या वर्षांमध्ये वर्ग पाचवी आणि वर्ग आठवी साठी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त संस्था आणि सर्व राज्यातील शाळांमध्ये 2 एप्रिल पासून वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे अशा प्रकारचे शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे.
सर्व शाळांनी आपापल्या स्तरावर शाळेने परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत यासाठी योग्य ती दक्षता घ्यायची आहे असे आवाहन राज्य शासनाने केलेले आहे.
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी प्रश्नपत्रिकांचे शालेय स्तरावर बनवण्यात येणार आहेत यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर देखील प्रश्नपत्रिकांचे नमुने देण्यात आलेले आहेत त्यानुसार प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून या परीक्षेचे आयोजन शिक्षकांनी करावयाचे आहे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
सदर परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे वार्षिक परीक्षांसाठी पाचवीला प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित परिसर अभ्यास हे विषय असतील तर आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित संकलित मूल्यमापन क्रमांक दोन म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे सदर परीक्षा देणे ही बंधनकारक असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना नापास करण्याची देखील परवानगी आलेली आहे.
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेस बसणे बंधनकारक आहे कारण या परीक्षेत पास होणे गरजेचे असल्यामुळे सदर शासनाने निर्देश दिलेले आहेत. परीक्षेसाठी प्रत्येक शाळाने शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यायची आहे शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या वेबसाईटवर mss.ac.in पाचवी व आठवीसाठी नमुना प्रश्नपत्रिका संविधान तक्ते देण्यात आलेले आहेत याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.