इयत्ता १ ली ते ४ थी मधील पात्र मुलींना देण्यात येणारा उपस्थित भत्ता शासन निर्णय upsthiti bhatta gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता १ ली ते ४ थी मधील पात्र मुलींना देण्यात येणारा उपस्थित भत्ता शासन निर्णय upsthiti bhatta gr

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येत आहे की, प्राथमिक शाळेत जाणाऱ्या १ ली मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेत उपस्थितीचे प्रमाण वाढ दिनांक १० जानेवारी, १९९२ च्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रत्येक मुलीस एक रूपया या दरान पालकांना उपस्थित भत्ता वार्षिक रू. २२० कमाल मर्यादेच्या राहून दिला जात होता. आता सदर योजना ही शासनाच्या दिनांक १३ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये DPC कडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रकरणी खालील तक्त्याप्रमाणे मागील तीन वर्षाच्या आकडेवारीची माहिती आजच संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी.

तसेच सन २०२४-२५ यामध्ये किती पात्र लाभार्थी आहेत व सदर भत्ता रूपये १/- ऐवजी रू. ५/- इतका केल्यास अपेक्षित अंदाजित खर्च याबाबतची माहिती देखील सादर करावी.

२. सदर माहिती मा. उपमुख्यमंत्री कार्यालयास सादर करावयाची असल्याने तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, ही विनंती.