जिल्हाअंतर्गत / आंतरजिल्हा बदली -२०२५ आक्षेप अर्ज pdf उपलब्ध teacher online transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हाअंतर्गत / आंतरजिल्हा बदली -२०२५ आक्षेप अर्ज pdf उपलब्ध teacher online transfer portal 

विषय : सन 2025 मध्ये होत असलेल्या ऑनलाईन बदली पुर्वी स्वतः दिव्यांग असलेले शिक्षक आणि ज्या शिक्षकांचे पाल्य किंवा पत्नी दिव्यांग आहे, आई वडील दुर्धर आजारग्रस्त आहेत त्यांच्या दिव्यांगत्वाची शारीरिक तपासणी करणे बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये आपनास विनंती करतो की, आपल्या जिल्ह्या मध्ये एकूण कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाणे प्रमाणाबाहेर वाढलेले असून त्यांची शारीरिक तपासणी करण्यात यावी याकरिता वारंवार आपल्या कार्यालयाला निवेदने सादर करण्यात आलेली आहे, या निवेदनावर दखल घेत आपल्या कार्यालयाने दोन वेळेस शारीरिक तपासणीचे आदेश दिल्या नंतर दोन्ही वेळेस जे खरे दिव्यांग आहेत असे शिक्षक वगळून इतर शिक्षकांनी मा. उच्च न्यायालय नागपूर येथून सदर आदेशाला स्थगिती आदेश मिळविलेला आहे, जेव्हा पासून ऑनलाईन बदल्या सुरू झाल्या आहेत तेव्हा पासून शिक्षकांमध्ये स्वतःचे, पाल्याचे, पत्नीचे, आई-वडिलांचे दिव्यांगत्वाबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर शिक्षक दिव्यांग असूनही त्यांच्याकडे दोन चाकी, चारचाकी वाहने चालविण्याचे परवाने आहेत, त्याचप्रमाणे स्वतःवर आक्षेप येऊ नये म्हणून काही शिक्षकांनी आपल्या पाल्याचे, पत्नीचे, आई-वडिलांचे दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले आहे, सदर प्रकरणे या व्यक्ति फक्त प्रमाणपत्रावरच दिव्यांग दिसतात प्रत्यक्षात ते सर्वसामान्य माणसाप्रमाणे सदृढ आहेत, किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण नगण्य आहे हे खालील बाबीवरून लक्षात येते.

1) पाल्याचे प्रमाणपत्र आहे परंतु सदर पाल्य शिकत असलेल्या शाळेत त्याची दिव्यांगत्वाची नोंद नाही.

2) स्वतःचे प्रमाणपत्र आहे परंतु सेवा पुस्तकामध्ये या बाबतीत नोंद केलेली नाही.

3) शासनाद्वारे दिव्यांगांना दिल्या जाणारा वाहन भत्ता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर नाही.

4) सदर प्रमाणपत्रे वापरुन आयकर विभागाकडूनही सवलती घेतल्याजात आहे, सदर बाबीची सेवापुस्तकात कोणतीही नोंद नाही.

5) दिव्यांगत्वाचा लाभ घेण्यासाठी सेवा पुस्तकावर नोंद असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याचाच विचार करण्यात यावा.

6) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ज्यांच्या नावाने आहे, त्यांची या संबंधी कोणतीही वैद्यकीय उपचाराचा तपशील उपलब्ध नाही.

7) ज्यांची मुळ नियुक्ती दिव्यांगप्रवर्गातून झालेली आहे त्यांनाच बदली प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे. वरील प्रकारामुळे संवर्ग 4 अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांवर खालीलप्रमाणे अन्याय होतो.

1) सेवाकनिष्ठ असूनही बनावट दिव्यांगत्वाच्या आधारे सदर शिक्षक संवर्ग 4 अंतर्गत असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकाच्या जागी बदली मागून हे शिक्षक सदर सेवाजेष्ठ शिक्षकाला बदली प्रक्रियेमध्ये ढकलत आहे.

2) प्रमाणपत्राच्या आधारे बदली प्रक्रियेस नकार देऊन सेवा जेष्ठ शिक्षकांना मिळणारी जागा बदलीपात्र असूनही अडवून ठेवतात परिणामी सेवा जेष्ठ शिक्षकांना विस्थापित होण्याची वेळ येते.

3) सदर प्रकरणाशी संबंधित नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिका दाखल असून जोपर्यंत या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत संवर्ग अंतर्गत लाभ देण्यात येऊ नये.

जोपर्यंत भाग संवर्ग एक मधील दिव्यांगत्वाच्या आधारे बदलीप्रक्रियेमध्ये लाभ घेणारे शिक्षक स्वतःची. पाल्याची, पत्नीची, आई-वडिलांची शारीरिक पुनर्तपसणी करत नाही तोपर्यंत त्यांना भाग संवर्ग एक चा लाभ देण्यात येऊ नये करिता आक्षेप अर्ज सेवेशी सादर,

Join Now