STEM व रोबोटिक्स या विषयावर आयोजित मार्गदर्शन वेबिनार २०२५ बाबत steam robotics webinar 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

STEM व रोबोटिक्स या विषयावर आयोजित मार्गदर्शन वेबिनार २०२५ बाबत steam robotics webinar 

संदर्भ :-. मा. संचालक, प्रस्तुत यांनी दिलेले निर्देश दि. २४/१२/२०२४

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानविषयक आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी शालेय स्तरावरून कोर्डीग, कृत्रिम बुद्धिमत्ता इ. विषयांच्या संदर्भात आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी यांचेसाठी प्रशिक्षण, रोबोटिक लॅब व इतर साहित्य उपलब्ध करून देणे, मार्गदर्शनपर ऑनलाईन सत्राचे आयोजन करणे इ. अनेक शैक्षणिक उपक्रम घेण्यात येत आहेत.

शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या रोबोटिक लॅब, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा इ. साहित्याच्या प्रभावी वापरातून रोबोटिक्स संदर्भात होणाऱ्या स्पर्धांमध्ये प्रोटोटाईप कसे तयार करावेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागासाठी माहिती होणे यासाठी उद्बोधनपर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनारचा तपशील पुढीलप्रमाणे-

वेबिनारचा विषय – STEM व रोबोटिक्स

दिनांक व वेळ – दि. ०१/०१/२०२५ रोजी दुपारी ४ ते ५:३० वाजता

यु-ट्यूब लिंक – https://youtube.com/live/TIENON-mSxg?feature=share

सदर ऑनलाईन वेबिनार सत्र इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोटोटाईप सादर करणे आणि रोबोटिक्स व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धामध्ये सहभागी होणे इ. विषयी माहिती होण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते इयत्ता

दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी वेबिनार सत्रामध्ये सहभागी होतील या दृष्टीने आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी.