खिशात मोबाईलचा स्फोट ! शिक्षकाचा जागीच मृत्यू spot of mobile due to death
खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली. या स्फोटात शिक्षकाच्या असलेली शेजारी वृद्ध व्यक्तीदेखील जखमी झाली आहे. जखमी वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा 👇
आता बीएड चा कालावधी पुन्हा एक वर्षाचा
कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच
शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर
इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
या स्फोटातील मृत शिक्षकाचे नाव सुरेश संग्रामे
असे आहे तर नत्थु गायकवाड असे जखमी वृद्धाचे नाव आहे. मृत शिक्षक आणि जखमी वृद्ध दोघेही एकमेकांचे नातेवाईक
आहेत. साकोला तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी असलेले शिक्षक संग्रामे आणि गायकवाड हे नातेवाईकाकडे
एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडे निघाले होते. यावेळी संग्रामे यांनी मोबाईल खिशात ठेवला होता. नातेवाईकाकडे जात असताना संग्रामे यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झाल्याने संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला. तर संग्रामे यांच्या शेजारी असलेले गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.