जि.प.प्राथ.शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री.रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप social worker institute 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
social worker institute
social worker institute

जि.प.प्राथ.शाळेतील मुलांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथिल सामाजिक संस्थेचे श्री.रजित गुप्ता यांचेमार्फत शैक्षणिक साहीत्य, खाऊचे वाटप social worker institute

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मुंबई येथील सामाजिक संस्थेमार्फत 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १०० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व खाऊच्या पॅकीटचे वाटप करण्यात आले . वाटप कार्यक्रम शाळेमध्ये महाराष्ट्र दिनी च्या दिवशी साजरा करणेत आला निकाला बरोबर मुलांना लेखन साहित्य , पाऊच, बिस्कीट, फ्रुटी, कॅटबरी, वेफर्स आदी साहीत्य मुलांना मिळाल्याने विद्यार्थांनी आनंद व्यक्त केला .
शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे, सौ मनिषा चव्हाण या सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते . १००% विद्यार्थी उपस्थिती होती .
मुलांना रजित गुप्ता यांचे कडून मिळालेल्या साहित्याचे वितरण सरपंच सौ मंदाकिनी कानडे , सौ सीमा खलाटे सौ राजश्री आगवणे , श्री किरण आगवणे पालक ग्रामस्थ यांचे उपस्थिति मध्ये वाटप करण्यात आले .
शाळेतील मुलांना वाटप करण्यात आलेल्या साहित्याचे मुंबई येथील संस्थेच्या मार्फत मिळातेबद्दल शाळेतील शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले .

Leave a Comment