श्री विठ्ठल आरती “युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा” shri vitthal arti sangraha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री विठ्ठल आरती “युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा” shri vitthal arti sangraha 

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा ।

पावे जिवलगा ।। जय देव

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।

कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरुड हनूमंत पुढे उभे राहती ।। जय देव

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाइ राणीया सकळा ।

ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।। जय देव

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।

चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय देव

संत नामदेव

आरती संग्रह पीडीएफ उपलब्ध डाउनलोड करून घ्या Click here