श्री शंकर आरती “लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा” shri shankar arti sangraha

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री शंकर आरती “लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा” shri shankar arti sangraha

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।

लावण्य सुन्दर मस्तकी वाळा ।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।

जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।।

जय देव कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभुतीचे उधळण शितकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव

देवी दैत्य सागर मंथन पै केले ।

त्यामाजी अवचीत हलहल जे उठले ।

ते त्वा असुरपणे प्राशन केले ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ।।

जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटीळक् रामदासा अंतरी ।। जय देव

समर्थ रामदासस्वामी

 आरती संग्रह पीडीएफ उपलब्ध डाउनलोड करून घ्या Click here