श्री दत्त आरती “त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा” shri datta arti
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगे समाधी न ये ध्यान ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरति ओवाळीता हरली भवचिन्ता ।। जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैसी नकळे ही मात ।
पराही परतली कैसा हा हेत ।
जन्म मरणाचा पुरलासे अंत ।। जय देव
दत्त येऊनीया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्तसन्न होउनीया आशीर्वाद दिधला ।
जन्मा मरणाचा फेरा वाचविला ।।जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हरपले मन झले उन्मन ।
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ।। जय देव
संत एकनाथ