काळ बदलतोय ! इंग्रजी शाळा बंद, मराठीसाठी गर्दी save marathi school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काळ बदलतोय ! इंग्रजी शाळा बंद, मराठीसाठी गर्दी save marathi school 

मराठी शाळेत मुले घालायचे आहे; पण जवळ चांगली मराठी शाळा नाही. असलीच तर शाळेतील शिक्षक कसे असतील, याविषयी संभ्रम आहे. मराठी शाळेत घातल्याने मुलगा मागे पडेल, ही भीतीदेखील आहे, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात येतात, पण, आता है सर्व बाद झाले आहे. शहरात आणि राज्यात इंग्रजी शाळा बंद केल्या जात असून, पालकांचा ओढा मराठी शाळांकडे अधिक असल्याचे दिसत आहे.

Save marathi school
Save marathi school

मराठी आपली मातृभाषा आहे. तिचा अभिमान प्रत्येकाला असावा, यात काही दुमत नाही. तो असायलादेखील हवा. त्याही पलीकडे जाऊन मराठीत शिकल्याने विषय पक्के होतात, चांगले ज्ञान मिळते. त्यामुळे मराठी शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी गर्दी होत आहे. वास्तव असे आहे की, मराठी माणूस घराबाहेर पडल्यावर भाजीपाला विक्रेते मराठी असले तरी सवयीने त्यांना हिंदीत बोलतात, खरंतर ज्या ठिकाणी इतर भाषा वापरायची ती वापरावीच लागते, पण, विनाकारण इतर भाषेत बोलू नये, मी दक्षिणेत गेलो, तेव्हा तिथली लोकं त्यांच्याच भाषेत बोलायची, आपल्याकडे मराठीचावत तसे दिसत नाही.

नागरिकांनी मराठीवरील प्रेम अधिक आस्थेने जपले पाहिजे. रोजच्या जगण्यात तिचा वापर अधिकाधिक ठेवला पाहिजे.

सध्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या प्रवेश मिळणं अवघड झाले आहे. इंग्रजी शाळेत चार पाच तुकड्या होत्या, तिथे एक तुकडी उरली आहे. गेल्या दहा वर्षांत परिस्थिती बदलली आहे. मराठीत शिकवलेला भाग विद्यार्थ्यांना कळतो. लक्षात राहतो. कला, क्रीडा अशा उपक्रमांना मुलांना वेळ देता येतो. त्यांचे विषय चांगले पक्के होतात. आता मराठी माध्यमाची परिस्थिती गंभीर नाही, भरपूर पैसे भरूनसुध्दा पालक मराठीकडे जात आहेत. कर्वेनगरमधील काही मराठी शाळा अशा आहेत, त्यांचे शुल्क अधिक आहे. तरीही पालक तिथे आपल्या पाल्यासाठी प्रवेश मिळवतात,

शुल्कासाठी कुरकुर नाही; गुणवत्तेवर भर

• एकीकडे इंग्रजी शाळा बंद होत असतानाच मराठी शाळा मात्र तग धरून आहेत, बदललेल्या परीस्थि- तीनुसार बहुसंख्य पालक मराठीकडे वळत आहेत. ज्यांना इंग्रजीकडे जायचे त्यांनी जावे. पालकांचे ते स्वातंत्र्य आहे. आता मराठी निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. मी शुल्क देण्यासाठी कुरकुर केली नाही. शाळेची गुणवत्ता यावर भर दिला. त्यासाठी काम करतोय,

• घरात मराठी बोलणाऱ्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण अवघड जात असल्याचेही अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे पालकांचा कल मराठी शाळांकडे वाढला आहे.

…हे असे घडत आहे

दहा वर्षापूर्वी मराठीसाठी रडारड होती. गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे. शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी ही आकडेवारी दिली होती. ही मराठीसाठी चांगली गोष्ट आहे.

खरंतर शाळेच्या दिशेने येणारा प्रवाह आटला आहे. पूर्वीच्या पिढीला दोन- चार मुले असायची. ती आता एकावर आली आहेत. सर्वांत जास्त फटका इंग्लिश मीडियमला बसला आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने त्यांच्या शाळा चालेनात.

महाराष्ट्रात दोनशेच्यावर इंग्रजी शाळा बंद झाल्या आहेत. पुणे शहरात १६ शाळा बंद केल्या आहेत. त्या संस्थाचालकांनी आम्हाला इंग्रजी शाळा चालवणं कठीण झाले आहे, असे सांगत असून, शाळा बंदसाठी अर्ज केले आहेत.

मराठीतून शिका अन् इंग्रजीतून उजळणी करा

• मी नेहमी म्हणतो, इंग्रजी फक्त डोळ्यांपर्यंत, मराठी मनापर्यंत… म्हणून मराठीत शिका. ज्ञान मिळवायचे असेल तर मराठी ही अतिशय सोपी आणि साधी भाषा आहे.

• उच्च शिक्षणाकडे जायचे असेल तर मराठीत शिकताना इंग्रजीतील काही पुस्तके घरी आणून त्याचा अभ्यास करा. असे प्रयोग मी केले आहेत. त्यातून हजारो रुपयांच्या शुल्काची बचत होते. मराठीतून शिका आणि इंग्रजीतून उजळणी करा. हे गणित पक्के करा.

वर्तमानपत्र पीडीएफ येथे पहा pdf download 

Leave a Comment