संचमान्यता सन २०२३-२४ मधील प्रलंबित शाळा व सन २०२४-२५ संचमान्यता बाबत sanchmanyata update 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यता सन २०२३-२४ मधील प्रलंबित शाळा व सन २०२४-२५ संचमान्यता बाबत sanchmanyata update

संदर्भ :

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक तक्रार २०१९/प्र.क्र.७५ टीएनटी-४,

दिनांक २९/८/२०१९

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. तक्रार २०१९/प्र.क्र.७५ टीएनटी-6. दिनांक १/१०/२०१९.

वरील विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की, सन २०२३-२४ च्या संच मान्यता तसेच, प्रलंबित संचमान्यता बाबत यापूर्वी माहे ऑक्टोबर, २०२४ मध्ये कॅप घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या.

तसेच मागील २ महीन्यापासून वारंवार V.C घेऊन सूचना केल्या आहेत. तरीही अद्याप साधारण ३६०० शाळा वकीग पोस्ट (कार्यरत पदे) प्रलंबित असल्याने सन २०२४-२५ संचमान्यता उपलब्ध करून देणेस अडचणी निर्माण होत आहेत. प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कार्यवाही होत नसल्याने दिनांक २०.०१.२०२५ पासून पुनश्चः विभागनिहाय शिबीर ई-बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबोरासाठी संचमान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी १ तज्ञ व्यक्ती (OTP) कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून संबंधितास निर्देश देण्यात यावे.

तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहोल याची दक्षता घ्यावी तसेच शिबीरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा अन्य कोणतीही व्यक्ती कर्मचारी येणार नाहा याची दक्षता घ्यावी.