सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत sanchmanyata durusti
संदर्भ :
१) शासन निर्णय क्रमांक SSN-2015 (प्र.क्र. 16/15)/TNT-2, दिनांक 15.03.2024
२) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत. पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/सं.मा.दु./२४/टे-५००/७६२६ दि.०९/१२/२०२४
३) या कार्यालयाचे पत्र क्र. जिपला/शिविप्रा/कार्या-01/File No.503/24 दि. 09/12/2024
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भ क्र. १ चे शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हश्या अधिनियम-२००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक, शाळांतील विद्याथ्याँच्या पटसंख्येच्या अधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजुर करणे इ. संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणेबाबतचा शासन निर्णय निमित करण्यात आलेला आहे.
संदर्भ क्र. २ अन्वये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खालील प्रमाणे माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
१. शिक्षक/शिक्षकेतर पदांची संच मान्यतेकरीता वर्कीग पोस्ट (मान्यता प्राप्त कार्यरत पदे) भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
२. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वर्ग खोल्याची अचूक माहिती भरणे.
३. मुख्याध्यापक यांनी ३० सप्टेंबर, २०२४ चे विद्यार्थी तुकडीनिहाय माध्यम पडताळणी करून संचमान्यतेकरीता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करुन संचमान्यतेकरीता फॉरवर्ड करावे.
प्रणालीवर उक्त कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व तसे या कार्यालयास अवगत करण्यात यावे. यानंतर सन २०२४-२५ च्या संचमान्यते काही त्रुटी राहील्यास त्यास संबंधीत मुख्याध्यापक व संबंधीत केंद्रप्रमुख यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याप्रमाणे संदर्भ क्र. ३ अन्वये कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार आपल्याकडून कार्यवाही झालेली असेल त्यामुळे खालील नमुन्यामध्ये माहिती सादर करण्यात यावी.