टपाली मतदान म्हणजे काय? Postal ballot
टपाली मतदान म्हणजे काय?
ज्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणूकीकरीता मतदान केंद्रावर नेमलेले, तथापि मतदार म्हणून दुस-या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेले अधिकारी / कर्मचारी
प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी ‘नमुना १२’ भरतांना आपले नाव ज्या लोकसभा व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत आहे, तो लोकसभा व विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, आपला अनुक्रमांक व पत्ता या बाबी अत्यंत अचूकपणे नमूद कराव्यात आणि ‘नमुना १२’ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रथम प्रशिक्षणावेळी जमा करावा.
दुस-या प्रशिक्षणाच्या वेळी आपल्याला मिळालेल्या टपाली मतपत्रिकेवर आपले मत नोंदवून ती दिलेल्या पाकिटामध्ये घोषणापत्रासह विहीत पद्धतीने सीलबंद करुन प्रशिक्षण स्थळी असलेल्या सुविधा केंद्रातील मतपेटीमध्ये टाका