राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती २०२५ police bharti recruitment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता पोलीस भरती २०२५ police bharti recruitment 

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२५ मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

२. त्याअनुषंगाने, समादेशक यांना कळविण्यात येते की, त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी.

१) आस्थापनेवरील सहा. पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस

शिपाई यांची दि. ०१/०१/२०२५ ची सेवाज्येष्ठता यादी (Seniority List) प्रसिदध करुन त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा.

२) आस्थापनेवरील सहा. पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर, हजर व रिक्त पदांबाबतची सदयस्थितीदर्शक माहिती या कार्यालयास सादर करावी.

३) दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत आस्थापनेवरुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी

या कार्यालयास सादर करावी.

तरी उपरोक्त नमुद मुद्यांची माहिती दिनांक १०/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजे पर्यंत या कार्यालयाचे ईमेल ade srpfoffice@mahapolice.gov.in वर सादर करण्यात यावी हि विनंती.

(मा. पोलीस उपमहानिरीक्षक, (मुख्या.) यांचे मान्यतेने)

Join Now