“मदर तेरेसा” व्यक्तीविशेष/भाषण/निबंध personal introduction vyaktivishesh

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मदर तेरेसा” व्यक्तीविशेष/भाषण/निबंध personal introduction vyaktivishesh

मदर तेरेसा

मदर तेरेसाः (जन्म (२६ ऑगस्ट, इ.स. १९१० अल्बानिया) या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार होते. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.

इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही. मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला.