“क्रिकेटपटू शिखर धवन” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन
शिखर धवन यांचा जन्म ५ डिसेंबर १९८५ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुनैना धवन आणि वडिलांचे नाव महेंद्र पाल धवन आहे. भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवनने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तारक सिन्हा असे त्याच्या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्याने सुरुवातीचे क्रिकेट प्रशिक्षण आपल्या प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली सोनेट क्लबमध्ये केले.
१ नोव्हेंबर २०१७ रोजी शिखर धवनने न्यूझीलंड विरुद्ध ५२ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या. तो त्याचा टी-२० मधील सर्वाधिक स्कोअर होता. १७ डिसेंबरला धवनने श्रीलंकेविरुद्ध खेळतांना त्याचे १२ वे एक दिवसीय सामन्यातील शतक झळकावले आणि ४००० धावा सर्वात जलद गतिने करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. त्याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार मिळाला.
मार्च २०१९ पर्यंत शिखर धवनने २३ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली होती ज्यात कसोटी सामन्यातील ७ शतकांचा आणि एक दिवसीय सामन्यांतील १६ शतकांचा समावेश आहे. शिखरची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादी न संपणारी आहे. त्याचे गब्बर हे टोपण नाव त्याची बॅट सार्थ करून दाखवते.