केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्हानिहाय  (असाक्षर व्यक्तींची संख्या) व सर्वेक्षणाबाबत nirakshar sarvekshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्हानिहाय  (असाक्षर व्यक्तींची संख्या) व सर्वेक्षणाबाबत nirakshar sarvekshan 

(सन २०२२-२७) अंमलबजावणी करिता सन २०२४-२५ चे जिल्हानिहाय उद्दिष्ट वितरण (असाक्षर व्यक्तींची संख्या) व सर्वेक्षणाबाबत.

संदर्भः-

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः नभासाका-०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२ दि.१४.१०.२०२२ व दि.२५.०१.२०२३

२. मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली दि.१८.०४.२०२३ रोजी संपन्न राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण-नियामक परिषद बैठकीचे मंजूर इतिवृत्त दि.११.०५.२०२३

३. या कार्यालयाचे पत्रजा.क्र. शिसंयो/नभासाका/मार्गदर्शक सूचना/२०२३-२४/१३२२ दि.०४/०७/२०२३

४. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई दि.२४.६.२०२२ मधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०, प्रौढ शिक्षण विषयक टास्क क्र. २५०,२५२,२५५,२५७.

५. केंद्र शासनाचे पत्र जा.क्र. ९-२/२०२१-एन.एल.एम-१ (भाग-१) दि.२८.६.२०२३.

६. केंद्रशासनाद्वारे नभासाका अंमलबजावणीसाठी देण्यात आलेला Road Map

७. F.No.1-1/2022-AE-4 Government of Education, Department of School Education & Literacy Adult Education Bureau नुसार दि. २२/०३/२०२४ रोजीची Project Approval Board (PAB) ची बैठक.

८. F.No.1-1/2022-AE-4 Government of Education, Department of School Education & Literacy Adult Education Bureau नुसार दि. २४/०३/२०२४ रोजीची Project Approval Board (PAB) च्या बैठकीचा कार्यवृत्तांत.

९. उल्लास अॅपवरील असाक्षर / स्वयंसेवक नोंदणी रिपोर्ट

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यामध्ये संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णय दि.१४.१०.२०२२ अन्वये सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत (६० महिने) उल्लास “नव भारत साक्षरता कार्यक्रम” या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि.२५.१.२०२३ अन्वये सदर योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.२ अन्वये, मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली दि.१८.०४.२०२३ रोजी संपन्न झालेल्या राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये केंद्र/राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे कामकाज पूर्ण करणेबाबत निर्देशित केलेले आहे. संदर्भ क्र.३ मधील शासन निर्णयानुसार मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

(National Education policy)- २०२० मधील साक्षरता कार्याक्रमासंबंधित टास्कच्या पूर्ततेसाठी नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही प्रभावीपणे करणेबाबत वेळोवेळी सूचित केलेले आहे.

सदर योजनेचा कालावधी एप्रिल २०२२ ते मार्च २०२७ असा आहे. राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याकरीता ६ लक्ष २० हजार एवढे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. तसेच सन २०२३-२४ या वर्षातील ६ लक्ष २० हजार उद्दिष्ट लक्षात घेता एकूण १२ लक्ष ४० हजार उद्दिष्टानुसार राज्यात कार्यवाही करणे अपेक्षित आहे. संदर्भ क्र.७ अन्वये केंद्रशासनाने PAB बैठकीत महाराष्ट्र राज्यासाठी मागील दोन आर्थिक वर्षातील (२०२२-२३ व २०२३-२४ ) उद्दिष्टानुसार सन २०२४-२५ मध्ये कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच सन २०२४-२५ मध्ये कोणतेही नवीन उद्दिष्ट दिलेले नाही. एकूण १२,४०,००० इतक्या उद्दिष्टापैकी ४,५९,९९४ इतक्या नव साक्षरांनी दि. १७ मार्च २०२४ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा दिलेली असून जिल्हाकडून प्राप्त माहितीच्या आधारे त्यापैकी २४,०,९३ इतके नवसाक्षर सुधारण आवश्यक (Need Improvement) शेरा प्राप्त आहेत. त्यामुळे चालू वर्षात सन २०२४-२५ करिता ८,०४,०९९ इतक्या उर्वरित असाक्षरांची FLNAT परीक्षा घेणे आवश्यक आहे. तसेच उल्लास नोंदणी अॅपनुसार मार्च २०२४ अखेर ६,६२,६६३ इतकी नोंदणी झालेली आहे. त्यानुसार ५,७३,३३७ (१२,४०,०००

६,६२,६६३) चालु आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये इतकी नोंदणी होणे आवश्यक आहे. संदर्भ क्र. ७ व ८ नुसार केंद्रशासनाच्या PAB च्या बैठकीतील सुचनेनुसार राज्यात FLNAT परीक्षा घेण्यासाठी असाक्षरांचे उद्दिष्ट संख्या ८,०४,०९९ व असाक्षर नोंदणी उद्दिष्ट संख्या ५,७३,३३७ इतकी निश्चित करण्यात येत आहे. जिल्हयांना सन २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार असाक्षर लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर तालुका, केंद्र, गाव स्तर उद्दिष्ट निर्धारित करुन या कार्यालयास दि २ मे २०२४ अखेर पर्यंत जिल्हास्तर उद्दिष्ट वितरण अहवाल सादर करावा.

संदर्भ क्र. ३ नुसार उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमाची जिल्हयामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावरुन असाक्षरांचे सर्वेक्षण, प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन, परीक्षा आयोजन इत्यादी संदर्भाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सन २०२४-२५ मध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी संचालनालयस्तरावरुन जिल्हानिहाय असाक्षर उद्दिष्ट संख्या देण्यात येत आहे. चालु वर्षासाठी (सन २०२४- २५) देण्यात येत असलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता एप्रिल/मे मध्ये असाक्षर व्यक्तींची माहिती घ्यावी म्हणजे शाळापूर्वतयारी, दाखलपात्र विद्यार्थी शोध मोहिम चालू असतेवेळी सर्वेक्षक नेमून असाक्षरांची उल्लास अॅपवरील सर्व मुद्दानुसार घ्यावी. सर्वेक्षकांच्या Login द्वारे उल्लास अॅपवर स्वयंसेवक आणि असाक्षरांची माहिती भरावी. दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करुन या कार्यालयास अहवाल सादर करावा. सहपत्र-

👉👉शासन निर्णय pdf download 

 

१) NBSK सन २०२४-२५ चे जिल्हानिहाय उद्दिष्ट (असाक्षर व्यक्तींची नोंदणी करावयाची संख्या, परीक्षेस बसवायच्या परीक्षार्थीची संख्या)

nirakshar sarvekshan 
nirakshar sarvekshan
Nirakshar sarvekshan
Nirakshar sarvekshan

Leave a Comment