राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन करणेबाबत national ganit utsav din ayojan

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन करणेबाबत national ganit utsav din ayojan

संदर्भ :- १. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मध्ये गणित विषयाचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी लागावी यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे.

गणित विषयाचे पूर्व प्राथमिक स्तरापासून कृत्ती आधारित व आनंदायी पद्धतीनेअध्यापन व्हावे यासाठी या स्तरापासूनध खेळ आधारित अध्यापन शाख, गणितीय खेळ, कोडी, परिसरातील गणित यांचा समावेश दैनंदिन गणित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करावा याविषयी धोरणामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णय उपलब्ध 

तसेच, गणित विषयाची ध्येये ज्यामध्ये पायाभूत स्तरावर प्रारंभिक संख्याज्ञान संपादन ते परिसरातील अनुभवांशी गणिताची जोड, व्यवहारात सहजतेने वापर ते उच्च विचार प्रक्रियांचे विकसन गणितीय तर्क करणे, गणितीय मर्मदृष्टी (Mathematical Intuition) ते विचारांचे गणितीकरण यांचा समावेश आहे. भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सव-२०२४” चे आयोजन दिनांक २२ डिसेंबर २०२२रोजी आयोजन राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्येव अंगणवाडीमध्ये करण्यात यावे. यावर्षीच्या” गणितोत्सव” ची प्रमुख संकल्पना (Theme) “नवनिर्मिती आणि प्रगती साठी गणित: एक दुवा” (Mathematics :The Bridge to Innovation and

Progress) ही निश्चित करण्यात येत आहे.

सदर संकल्पनेवर आधारित “गणित्तोत्सव-२०२४” मध्ये खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. सदर नियोजन करत असताना विद्यार्थी, शाळा, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक यांचा सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.

पायाभूत स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम संकल्पना (Theme) “नवनिर्मिती आणि प्रगती साठी गणित : एक दुवा ”

(Mathematics: The Bridge to Innovation and Progress)

उपरोक्त सर्व उपक्रमामध्ये आपण, सर्व क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, गणित प्रेणी यांनी प्रदर्शनास भेटी द्याव्यात. उपरोक्तप्रमाणेविद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा /कार्यक्रमाचा२ ते ३ मिनिटाचा व्हिडीओ व फोटो, समाज संपर्क माध्यमांवर (उदा. इंस्टाग्राम, फेसबुक व इतर) #Nationaleducationpolicy२०२०,

#Mathematicsday२०२४,#Ganitotsa २०२४#SCERTMAHARASHTRA या HASHTAG (#)चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी व प्रस्तुत कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज SCERT, MAHARASHTRA ला टॅग कराये.

“गणित्तोत्सव-२०२४” चे आयोजन उत्साहाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने व्हावे याकरिता आपले स्तरावरून प्रयत्न करावेत तसेच आपण व क्षेत्रीय अधिकारी यांनी भेट द्यावी.