इ.१०वीच्या विज्ञान भाग-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याबाबत missing questions
संदर्भ- श्री कपिल हरिश्चंद्र पाटील, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद, अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी यांचे दि. २०/०३/२०२४ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या दि. १८ मार्च २०२४ रोजीच्या इ.१०वी विज्ञान भाग १ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न १(वी) मधील । कमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. या आशयाचे संदर्भीय पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
पाठ्यपुस्तकानुसार सदर प्रश्नाचे अचूक उत्तर ‘हेलियम’ हे आहे. तर काही संदर्भपुस्तकांमध्ये याचे उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
त्याअनुषंगाने पुणे विभागीय मंडळाने संबंधित विषयाच्या विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतले असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वरील दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उपरोक्त प्रश्नाचे उत्तर ‘हेलियम’ किंवा ‘हायड्रोजन’ लिहिले असल्यास ते ग्राहय धरून गुणदान करावे. असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित विषयाचे सर्व
नियामक व परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात सूचना देण्यात याव्यात.
तरी उपरोक्त निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळास सादर करावा.