प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत अंडी व केळी करीता अनुदान मागणी नोंदविणे बाबत mid day meal andikeli anudan
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत अंडी व केळी करीता शाळांना / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था अनुदान वितरण करणे करीता अनुदान मागणी नोंदविणे बाबत..
शासन परिपत्रक येथे पहा download
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इ १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शाळास्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ या कालावधीमध्ये माहे नोव्हेंबर, २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीकरीता आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. तसेच सन २०२४-२५ या कालावधीमध्ये त्रिस्तरीतय आहार रचनेप्रमाणे दोन आठवड्यातून एक वेळेस अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
राज्यातील अनेक जिल्हे आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना अंडी व केळी अनुदान देणे प्रलबित असून याकरीता वेळावेळी संचालनायाकडे अनुदान मागणी करण्यात येत आहे. सबब सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत योजनेस पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ दिले असलेची खात्री संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी.
२. माहे नोव्हेंबर, २०२३ ते एप्रिल, २०२४ या कालावधीकरीता अदा करावयाच्या रकमेची परिगणना मुद्दा क्रमांक १ मध्ये नमूद केलेनुसार शाळा अथवा केंद्रीय स्वयंपकागृहाकरीता आवश्यक अनुदान आणि शाळांना वापूर्वी वितरीत अग्रीम रक्कम व उर्वरित अदा करावयाची फरकाची रक्कम याची परिगणना करून त्यानुसार अनुदान मागणी संचालनालयाकडे नोंदविण्यात यावी.
३. फरक रकमेची मागणी शाळांनी प्रत्यक्ष अंडी या पदार्थाचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संखेच्या प्रमाणात करण्यात यावी, केळी अथवा इतर फळांचा लाभ दिला असल्यास अंडी करीता निर्धारित फरकाच्या रकमेची मागणी करण्यात येऊ नये.
४. केंद्रीय स्वयंपाक्रगृह संस्थांकडील शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात आवश्यक अनुदान मागणी मुद्दा क्रमांक २ मधील दरानुसार निर्धारित दिवसांच्या संखेनुसार व प्रत्यक्ष लाभ दिला असल्याची खात्री करुनच अनुदान मागणी करण्यात यावी.
शासन परिपत्रक येथे पहा download
५. सन २०२४-२५ या कालावधीकरीता त्रिस्तरीय आहाराचा लाभ संबंधित शाळांनी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांनीं विद्यार्थ्यांना दिला असल्याची खात्री करण्यात यावी व तसे मुख्याध्यापक यांचे मार्फत प्रमाणित करुन घेण्यात यावे. जिल्हास्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांकडील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र दफ्तरी ठेवण्यात यावेत तसेच आवश्कतेनुसार सदरची माहिती संचालनालयास सादर करण्यात यावी.
६. शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या नियमित आहाराची माहिती एम.डी. एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. फरकाची रक्कम वितरण करताना अनुदान मागणी करण्यात आलेल्या सर्व शाळा नियमितपणे एम. डी. एम पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदवित असल्याची खात्री तालुक्यामार्फत करुन घेण्यात यावी.