प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत mid day meal

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत mid day meal

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत योजनेस पात्र असणा-या शाळांनी शाळास्तरावर आहार घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती मोबाईल अॅप तथा वेबसाईटच्या माध्यमातून नियमितपणे संकेतस्थळावर नोंदविणे आवश्यक आहे. प्रस्तुत माहितीच्या आधारे शाळांची ऑनलाईन देयके जनरेट होत आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र व व्हॉट्सअॅप द्वारे वेळोवेळी सुचना देऊन देखील काही शाळांची माहिती भरणे प्रलंबित असल्याने, सदरची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत विनंती संचालनालयाकडे करण्यात येत आहे.

Mid day meal
Mid day meal

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांना (केंद्रीय स्वयंपाकगृह आणि ग्रामीण भागातील) माहे एप्रिल, २०२३ ते जानेवारी २०२४ अखेरच्या कालावधीतील प्रलंबित माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर सुविधा दि. ०६.०३.२०२४ पर्यंत उपलब्ध असेल, तदनंतर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव पुन:श्च बॅक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.

MDM ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे click करा 👇👇

App download 

याबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुखांना अवगत करुन देण्यात यावे. तसेच निर्धारित कालावधीमध्ये प्रलंबित शाळांकडून माहिती भरली जाईल याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

पोर्टलवर मागील माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा👇👇👇👇👇

MDM web portal login 

Leave a Comment