०५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरीत निर्गमित करण्याबाबत march 2024 payment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

०५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरीत निर्गमित करण्याबाबत march 2024 payment 

मार्च अखेर कामांचे कारण न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश त्वरीत निर्गमित करण्याबाबत.

संदर्भ :

१)मा. श्री. श्रीकांत गोविंदरव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दि.२०/३/२०२४ चे निवेदन मा. शिक्षण आयुक्तालयाचे दि. २७/३/२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त.

२) श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सिल्लोड यांचे पत्र pi SAR/H2H/MRJPHS/24-09/ ईद व जयंती निमित्य वेतन दि १८/३/२०२४

चे निवेदन मा. शिक्षण आयुक्तालयाचे दि. १९/३/२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त.

३) श्री. प्रविण खाडे, राज्य महासचिव, महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ, पुणे यांचे दि. १७/०३/२०२४ चे निवदेन

महोदय,

मा. श्री. श्रीकांत गोविंदरव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक २०/०३/२०२४ च्या निवेदनाद्वारे तसेच श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सिल्लोड यांनी त्यांचे दिनांक १८/०३/२०२४ च्या निवेदनाद्वारे व श्री. प्रविण खाडे, राज्य महासचिव, महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ, पुणे यांनी त्यांचे दिनांक १७/०३/२०२४ च्या निवदेनाद्वारे राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत संदर्भिय निदेवदाद्वारे मागणी केली आहे.

तरी संबंधित निवेदनातील मागणीनुसार रमजान ईद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च २०२४ च्या वेतनाकरीता निधी दिनांक ०२/०४/२०२४ पर्यंत उपलब्ध होण्याबाबत शासनस्तरावरुन उचित ते निर्देश व्हावेत ही विनती.

सोबत :- संदर्भिय निवेदन

March 2024 payment
March 2024 payment

 

Leave a Comment