मा.न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या अभिलेख्यामध्ये सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदींची गावनिहाय प्रसिद्धी करणे व पात्र व्यक्तींना कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देणे बाबतmaratha aarakshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 मा.न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या अभिलेख्यामध्ये सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदींची गावनिहाय प्रसिद्धी करणे व पात्र व्यक्तींना कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे देणे बाबतmaratha aarakshan 

(दिनांक १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी विशेष मोहिम (कॅम्प) राबविणे बाबत.)

:- १. मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. २०२४/सा.प्र./ आस्था/कुणबी/समिती/ कावि- दि.१५.०१.२०२४

२.या कार्यालयाचे पत्र समक्रमांक दि.१६.०१.२०२४

३. मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. २०२४/सा.प्र./ आस्था/कुणबी/समिती/ कावि- दि.१६.०१.२०२४

उपविभागीय अधिकारी यांचे पत्र येथे पहा 👉PDF download 

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. ०१ च्या अनुषंगाने संदर्भ क्र. ०२ अन्वये आपणास आपले उपविभागात/तालुक्यात आढळून आलेल्या कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा जातीच्या नोंदींची गावनिहाय, विभागनिहाय, अभिलेख प्रकार निहाय व व्यक्ती निहाय तात्काळ यादी करुन उक्त नमूद प्रमाणे कार्यवाही अनुसरुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करणे बाबत कळविणेत आले होते. प्रकरणात संदर्भ क्र. ०३ च्या पत्रान्वये ज्या गावामध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत अशा नोंदींची गावनिहाय, विभागनिहाय, अभिलेख प्रकार निहाय व व्यक्ती निहाय नोंदींची यादी तयार करुन प्रसिद्ध करावयाच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने दिनांक १७ व १८ जानेवारी २०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवून तसेच ग्रामपंचायत/तलाठी कार्यालयात जात प्रमाणपत्र मागणीचे कोरे नमुने नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत. महा-ई-सेवा केंद्रामार्फत

d: witthal pol-| मराठा आरक्षण५ मराठा समाज आरक्षण.docx

प्राप्त जात प्रमाणपत्रांचे अर्ज प्राधान्याने छाननी करुन जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी मार्फत वितरणाची कार्यवाही करावी. सदरील विशेष मोहीमेत तालुकानिहाय गावनिहाय प्राप्त अर्जाबाबतचा अहवाल दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता सादर करणे बाबत कळविण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने संदर्भीय पत्राची छायांकीत प्रत यासोबत देवून कळविण्यात येते की, उक्त प्रमाणे कार्यवाही अनुसरुन सदरील विशेष मोहीमेत तालुकानिहाय गावनिहाय प्राप्त अर्जाबाबतचा अहवाल दिनांक १८.०१.२०२४ रोजी सायं. ६.३० वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करावा.

सोबतः- वरीलप्रमाणे

Leave a Comment