महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मुलाखत कार्यक्रमाबाबत maharashtra public service commision
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबत.
संदर्भ: जाहिरात क्रमांक ०७०/२०२३.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील शारीरिक चाचणीकरीता अर्हतापात्र ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक १७ ते २७ डिसेंबर, २०२४ या कालावधीत घेण्यात आलेला आहे.
२. सदर शारीरिक चाचणीतून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ११ ते १४ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नं.३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे घेण्यात येणार आहेत. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.