क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंतीनिमित्त 10 ओळींचे सोपे/सुंदर मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti bhashan
स्त्रियाच्या अंधा-या जीवनात, पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती… अमर आहे सावित्री …
अमर आहे सावित्री….
१. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र- मैत्रिणींनो… सर्वांना माझा नमस्कार ।
२. आज मी आपणासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे.
३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या.
४. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला.
५. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
६. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला- वाचायला शिकवले व स्त्री-शिक्षणाचा पाया रचला.
७.क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी १ जानेवारी १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली.
८. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपन, सती प्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला.
९. त्यांनी काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाजजागृती केली.
१०. अखेर, १० मार्च १८९७ रोजी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला.
अशा या तेजस्वी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी, कोटी प्रणाम । जय हिंद, जय महाराष्ट्र ।