“मी सावित्रीबाई बोलतेय” एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुंदर एकांकिका krantijoti savitribai fule ekankika 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मी सावित्रीबाई बोलतेय” एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुंदर एकांकिका krantijoti savitribai fule ekankika 

ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असुनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का ?

ओळखलत का मला मी सावित्री. सावित्राबाई ज्योतीराव फुले सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या नव्या वर्षी ज्योतीराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो-करोड़ोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य त्यांना मी शेठजी म्हणायचे.

फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. माझा हात घर-घर कापत होता. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला शिकवलं. मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजीच.

एकदाची शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजीसारखाच मोठा विचार करायला शिकली 1 जानेवारी होय. शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरु केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा.

शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या

लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत. वाघासारखे जगलात तर नाम होत. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो. घाबरण किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं.

सनातनांचा मात्र धर्म बुडाला. धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती. सर्व सामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसाकाय धर्म बुडतो यांचा, इतका तकलादू असू शकतो का धर्म, धर्म माणसासाठी असतो की, धर्मासाठी माणूस.

शेठजी घरोघरी जाऊन मुलीना गोळा करत होते. त्यांच्या आईबापांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवर्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हत. ते शिक्षकांना वाळीत टाकण्याच्या धमक्या देत होते. शेठजी विचारात पडले मी शेठजीना म्हणाले,

शेठजी कंचा विचार करताय क्या हाय नव्ह म्या ‘शिकविण पोरीना’ असं म्हणून मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर

आला तो म्हणाला, ऐ बाई। कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवण. कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतीराव पहेलवानांची पत्नी होते.

मग उचलला हात आणि दिली त्याच्या थोबाडीत त्याक्षणीच. त्याला सुनावल आज समोर आलायस थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन.

कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली पाहताच तिथून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केल. शिव्या दिल्या, दगडफेक केली, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.

दिवसा मागून दिवस गेले अंधारात उजेड येत होता. लोकांना शिक्षणाच महत्त्व कळू लागलं. 4 वर्षातच आमच्या 18 शाळा झाल्या. पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर न पडू देणं, सती जाणं या सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या. अश्भयातच भयंकर प्लेग पसरला, आम्हीं रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मला हि प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाला.

म्हणून म्हणते स्त्रीला शिकू द्या, विचार करू दया कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते व पशुत्व हटते बरं येते ह मी .

जय हिंद जय महाराष्ट्र…..